
आजकाल मानवी वस्तीत वन्य प्राण्यांच्या येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात वाघ आणि बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसतात.परंतु आता मुंबईजवळ भिवंडीतदेखील बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसला आहे. भिवंडीतील पडघा परिसरात बिबट्या दिसला आहे. (Viral Video Of Leopard)
पडघा परिसरात बिबट्या हा गटारात अडकला होता. त्यामुळे त्याला बाहेर येता येत नव्हते. बिबट्याच्या बचावकार्यासाठी SGNP टीम आणि PAWS सदस्यांसह वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी बिबट्याला सुखरुप बाहेर काढले आहे. (Viral Video Of Leopard)
भिवंडी परिसरात जर बिबट्या फिरायला लागला तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे.बिबट्या गटारात अडकल्याचे कळल्यावर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या बिबट्याला बाहेर काढून त्याला जेरबंद करण्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. (Leopard In Bhiwandi)
यामध्ये टीम पॉज सदस्य रुषिकेश सुरसे, पियुष पालव आणि भूषण पवार यांनी SGNP टीम आणि वन विभागाला मदत केली. यामुळे बिबट्या सुखरुप बाहेर निघाला. या बचावकार्यासाठी तब्बल ८ तासांपेक्षा जास्त वेळ गेला. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ८ तास लागले. बिबट्या बाहेर काढताच अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच नागरिकांच्याही जीवात जीव आला.
वाघ, बिबट्यांचा रस्त्यावर वावर (Tiger And Leopard In Bhiwandi)
याआधीही अनेकदा वाघ आणि बिबट्या रस्त्यावर फिरत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेकदा तर बिबट्या आणि वाघांनी नागरिकांवर हल्लादेखील केला आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण जखमी झाले आहे. बिबट्या आणि वाघ रस्त्यावर वावरत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडायचे की नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.