Viral Video: एनडीएच्या 147 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न; पाहा हा शानदार आणि जबरदस्त व्हिडिओ

Convocation Ceremon Video: सध्या आज पुण्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन सोहळा पार पडत आहे.
Convocation Ceremon Video
Viral VideoSaam Tv
Published On

Pune Nda: पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन आज होत आहे. एनडीएतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीए ची १४७ वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे.एनडीएतील खेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न होत आहे

देशाचे हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग दीक्षांत संचालनाच निरीक्षण करणार आहेत.लष्करी शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहोल्यातून घडतं.लष्करी हेलिकॉफटर्स तसेच लढाऊ विमानांची सलामी हे या सोहोल्याच विशेष आकर्षण असतं.

एनडीए तील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कडेट्स चा याप्रसंगी पदकं देऊन गौरव करण्यात येत.दीक्षांत संचालनाचा हा सोहळा कडेट्स साठी स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो.इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. देशवासीयांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण म्हणता येईल.दीक्षांत संचलनाच्या निमित्ताने सूर्यकिरण हेलिकॉप्टर्सची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.

दीक्षांत संचलन सोहळा हा युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''saamtv'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सध्या सर्वत्र पाहिला जात असून प्रत्येकाला या क्षणाचा अभिमान वाटत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Convocation Ceremon Video
Viral Video: अरे देवा! दिल्ली मेट्रोत पुरुषांचा हाय वोल्टेज ड्रामा,लाथाबुक्क्यांनी हाणत एकमेंकाना तुडवले; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com