भारतात प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. कोणत्याही सणाच्या काही दिवसांपासून घरोघरी जोरदार तयारी सुरु होते,त्यातला एक सण म्हणजे रंगपंचमी. लहानापासून ते मोठ्यापर्यंत होळीच्या रंगात सगळे मिसळून जातात. विशेष म्हणजे लहान मुलं महिन्याअगोदरच रंगपंचमी खेळण्यास सुरुवात करतात.त्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दोन तरुण धावत्या कारमधून (Car)रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांवर पाण्याचे फुगे फेकताना दिसत आहेत.सध्या या तरुणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(Latest Marathi News)
होळी(holi) आणि रंगपंचमीचा सण येण्यासाठी अवघे काही दिवसच राहिले आहेत.आपल्याला गळोगल्ली तसेच आपल्या आजुबाजूच्या परिसरात अनेक लहान मुले पाण्याने भरलेले फुगे फोडून रंगपंचमी खेळताना दिसतात.मात्र अनेकवेळा काही हु्ल्लडबाज व्यक्तींमुळे असे सण साजरे करणे ही धोकादायक बनले आहे,त्यात या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणांनी केलेल्या प्रकारमुळे नेटकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल व्हिडिओ दिसते की, एक कार रस्त्यावरुन जात आहे मात्र या कारमध्ये दोन तरुण सनरुफमध्ये बाहेर उभे आहेत. त्यानंतर दोघे तरुण रस्त्यावरुन जात असलेल्या लोकांवर पाण्याने भरलेले फुगे फेकत आहेत.सर्व धक्कादायक प्रकार रस्त्यावरुन जात असलेला एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्या तरुणांनी शेवटला व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवरही पाण्याने भरलेला फुगा फेकला.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @sneha singh या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,''16 मार्च दुपारी नवी दिल्लीतील वसंत कुंज येथे दोन तरुण रस्त्यावरील व्यक्तींना पाण्याचे फुगे मारून फेकताना दिसले. हे खरंच खूप धोकादायक आहे आणि यामुळे कोणीही जखमी होऊ शकतो''.तसेच दिल्ली पोलीस आणि दिल्ली ट्रॅफीक पोलिसांना टॅग केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.