Viral Video of blink it Delivery boy who cancel women 3 packets of rat killed late night
Viral Video of blink it Delivery boy who cancel women 3 packets of rat killed late night Saam Tv

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Viral Video: आजकाल लोकांमध्ये माणुसकी राहिली नाही असे म्हटले जाते. पण, काही घटना अशा आहेत ज्या खरोखरच मन जिंकतात. अशीच एक घटना तामिळनाडूमधून अलीकडेच समोर आली आहे, जिथे एका डिलीव्हरी बॉयने एका महिलेचा जीव वाचवला.
Published on

Viral Video: अनेक भारतीय शहरांमध्ये, ब्लिंकिट आणि झेपटोवरुन वस्तू ऑर्डर करणे अत्यंत स्वाभाविक आहे. हे डिलिव्हरी पार्टनर एका पत्त्यापासून दुसऱ्या पत्त्यावर रोज अथक परिश्रम करतात. परंतु तामिळनाडूमध्ये अलिकडेच डिलिव्हरी पार्टनरसोबत घडलेल्या एका घटनेने हे दाखवून दिले की कधीकधी सतर्कतेमुळे एक क्षण जीवन बदलू शकतो. असेच एका डिलिव्हरी पार्टनरसोबत घडलेल्या त्या रात्रीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधले.

त्या रात्री, एका ब्लिंकिट डिलिव्हरी पार्टनरला उंदर मारण्याच्या विषाच्या तीन पॅकेटची डिलिव्हरी मिळाली. ही एक सामान्य घरगुती वस्तू आहे. पण खूप रात्री झाली होती यामुळे त्याला अस्वस्थ होत होता. त्याच्या आत काहीतरी बरोबर वाटत नव्हते. त्याला रात्री उशिरा अशी वस्तू ऑर्डर करणे विचित्र वाटले. जेव्हा तो ग्राहकाच्या घरी पोहोचला तेव्हा त्याचा संशय अधिकच वाढला. दार उघडणारी महिला रडत होती आणि पूर्णपणे तुटलेली दिसत होती. ही सामान्य डिलिव्हरीसारखी अजिबात नव्हती. त्याच क्षणी डिलिव्हरी पार्टनरला हे प्रकरण गंभीर असल्याचे समजले.

Viral Video of blink it Delivery boy who cancel women 3 packets of rat killed late night
Kriti Sanon Sister: नुपूर आणि स्टेबिन अडकले विवाहबंधनात; बहिणीच्या लग्नात क्रिती सॅननला अश्रू अनावर

नेमकं काय झालं?

अशा परिस्थितीत लोक लगेच सामान सोपवून पुढे जातात. पण यावेळी, त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. तो त्या महिलेशी शांतपणे बोलला आणि तिची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने स्वतःला इजा करणार नसल्याचे तिने सांगितले. परंतु तिची मानसिक स्थिती आणि रात्री उशिरा केलेली डिलिव्हरी त्या डिलिव्हरी पार्टनरला चुकीची वाटली.

Viral Video of blink it Delivery boy who cancel women 3 packets of rat killed late night
Krantijyoti Vidyalay: साऊथ-हिंदी चित्रपटांना मागे टाकत 'क्रांतिज्योती विद्यालय'ची घोडदौड; सकाळी ७ ते रात्री १२चे सगळे शो हाऊसफुल

त्याने मोठ्या संयमाने आणि संवेदनशीलतेने बोलणं सुरू ठेवले. त्याने तिला समजावून सांगितले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती कधीही सारखी राहत नाही. त्याने महिलेला खात्री दिली की आपले आयुष्य कोणत्याही समस्येपेक्षा महत्त्वाचे आहे. त्याच्या शब्दात कोणतीही जबरदस्ती किंवा धमकी नव्हती, फक्त काळजी होती. दीर्घ संभाषणानंतर, डिलिव्हरी पार्टनरने ठाम निर्णय घेतला. त्याने ऑर्डर रद्द केली आणि उंदराचे विष परत सोबत घेऊन गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com