Viral Video : नियतीसोबत गट्टी जमली! मैत्रिण बोलत नाही म्हणून भर वर्गात रडू लागली; VIDEO पाहून सर्वच भावुक

Emotional Viral video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओला पाहून प्रत्येकाला आपल्या शाळेतील जिवलग मित्र किंवा मैत्रीणींची नक्कीच आठवण येईल.
Viral Video
Viral Video Saam Digital
Published On

Girl Student Cried In Front Of The Class

शाळेचे दिवस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. शाळा म्हटलं की भरपूर आठवणी शाळेच्या संबंधित असतात. पहिल्या वर्गापासून ते अगदी शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक गमतीदार तसेच भावनिक गोष्टी घडलेल्या असतात. विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रवासात अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात. अनेक नवीन मित्र तयार होतात.मात्र शाळेतील मित्र मनाच्या कोपऱ्यात कायमच आठवणीत राहतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओला पाहून प्रत्येकाला आपल्या शाळेतील जिवलग मित्र किंवा मैत्रीणींची नक्कीच आठवण येईल.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेला व्हिडिओत दिसते की, व्हिडिओ एका शाळेच्या वर्गातील आहे. त्यात वर्गात अनेक विद्यार्थीनी बाकावर बसलेल्या आहेत त्याच्या समोर काही शिक्षकही आहेत. एक विद्यार्थींनी हातात माईक घेऊन वर्गात समोर उभी आहे. व्हिडिओ पाहून सुरुवातीला प्रत्येकाला असे वाटेल की ती भाषण देण्यासाठी उभी आहे.

मात्र काही वेळाने ती जे काही बोलते ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.माईक घेऊन ती बोलते की,'माझी नियती नावाची मैत्रीण माझी बेस्ट फ्रेंड होती आणि माझ्या एका चुकीमुळे ती माझ्याशी बोलत नाही. पण मला तिच्याशी बोलावसं वाटतं आहे.मी तिला खूप वेळेस सॉरी म्हणते. ती माझ्याशी बोलली पाहिजे,

इतकीच माझी इच्छा आहे'मैत्रिणी बद्दल बोलून झाल्यावर ती भावूक होऊन रडू लागते. तिला रडताना पाहून तिच्या बाजूला बसलेली शिक्षिका तिच्याजवळ येऊन तिचे डोळे पुसते. तसेत इतर विद्यार्थी तिचे बोलणे ऐकून हसताना दिसत आहे. पुढे एक विद्यार्थी तिच्या बेस्ट फ्रेंड नियती जवळ जातो आणि तिला या बोलण्यास सांगतो.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील@nikkkhi_lया इन्स्टापेजवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की,'नियतीचा खेळं'.व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे,'तिच्या बोलण्यातून दु:ख समजून येते.' व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com