Dance Viral Video: 'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे...'; मराठमोळ्या महिलेचा दुबईत हटके डान्स, व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल

marathi woman dance viral video:एका परदेशातील मराठमोळ्या महिलेचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
marathi woman dance viral video
marathi woman dance viral videoSaam tv

Marathi Woman Dance Viral:

सोशल मीडियावर आता रोजच नवनव्या गोष्टी व्हायरल होत असतात. इतरांसारखा आपलाही असाच व्हिडिओ व्हायरल व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे अनेक युजर वेगवेगळा प्रयत्न करत असतात. यामुळे अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर रील तयार करत सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच एका परदेशातील मराठमोळ्या महिलेचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता शॉर्ट रील्स व्हिडिओची क्रेझ वाढली आहे. यामुळे सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे रील व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामुळे आता बहुतांश जण लहान मुले, तरुण, जेष्ठ असे सर्वच रील व्हिडिओ तयार करण्याच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळतात.

अशी व्यक्ती जगात कुठेही गेली तरी रील बनवण्याची इच्छा पूर्ण करतेच. अशाच एका मराठमोळ्या विवाहित महिलेचा 'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे...' या गाण्यावरील रील व्हायरल झाला आहे.

marathi woman dance viral video
Mumbai Local Train Dance Video: लोकल ट्रेनच्या दरवाजात तरुणीचा पोल डान्स; नेटकऱ्याने थेट मुंबई पोलिसांनाच टॅग केलं

सायली गोडबोले नाव असणाऱ्या इन्स्टाग्राम युजर महिलेने थेट दुबईतील बुर्ज खलीफा खाली एक भन्नाट डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'या महिलेने नऊवारी साडी नेसली आहे.

नऊवारी साडी नेसलेल्या महिलेने 'नको मला बंगला, नको गाडी पाहिजे...' या गाण्यावर अफलातून डान्स केला आहे. महिलेने दुबईतील रस्त्यावर कोणाला न लाजता मराठमोळ्या लूकमध्ये डान्स केला आहे. या व्हिडिओत या महिलेचा नवरा देखील तिचा डान्स पाहताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा रील व्हिडिओला आतापर्यंत अडतीस हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर ३०० हून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.या व्हिडिओला आतापर्यंत २००० हून अधिक जणांनी शेअर केला आहे.

एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'परदेशात जाऊन पण आपली संस्कृती विसरत नाही, ते महत्वाचं आहे'. तर दुसऱ्याने म्हटलं की, 'खूप छान ताई! तुम्ही मराठी संस्कृती जपताय, तुमचा अभिमान वाटला'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com