Cobra Snake Video: पैसे अन् दागिने ठेवलेल्या तिजोरीत घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून थरकाप उडेल

किंग कोब्रा तिजोरीत शिरल्याचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पैसे आणि दागिने ठेवलेल्या तिजोरीत नाग दिसल्याने नेटकरी हादरले आहेत.
Cobra Snake Video
Cobra Snake VideoSaam Tv
Published On

साप म्हटलं की, अंगावर काटा येतो. यात किंग कोब्रा म्हंटल तर जास्तीच भिती वाटते. सोशल मीडयावर देखील काळजाला धडकी भरवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक विषारी कोब्रा साप पैसे आणि दागिन्यांनी भरलेल्या तिजोरी शिरताना दिसत आहे. यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे. पाहणाऱ्यांचा जीव घाबरला आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की कोब्रा तिजोरी बंद असतानाही आत कसा काय गेला..

Cobra Snake Video
Garba In Mumbai Local Train: महिलांचा स्वॅगच भारी, धावत्या ट्रेनमध्ये खेळला गरबा, Video व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका लोखंडी तिजोरीमध्ये एक साप गुंडाळलेला दिसत आहे. तिजोरी पैसे आणि दागिने ठेवले आहेत. साप त्यावर फणा काढून घिरट्या घालताना दिसत आहे. हे दृश्य इतके भयानक आहे की आत त्या ठिकाणी कोणीही जाण्याचा प्रयत्न करत नाही आहे. नाग हल्ला करताना दिसत आहे.

सोशल मिडिया एक्स @abhishek902444 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, 'मी नेहमीच याबद्दल ऐकले होते, पण आज मी ते पाहिले. मी जुन्या लोकांकडून, माझ्या आजी- आजोबांकडून ऐकत आले आहे. पूर्वी जिथे खजिना पुरला जायचा तिथे तो सापांनी सुरक्षित केला होता. पण हा साप लोखंडी कपाटात किंवा तिजोरीत नेमका कसा गेला? असा प्रश्न आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ३ लांखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने, 'नागराज एक प्रतिभाशाली आहे भाऊ.' हा एक अतिशय धोकादायक व्हिडीओ आहे. साप तिजोरीत कसा घुसू शकतो? असं देखील त्यानं म्हंटल आहे.

Cobra Snake Video
Viral Video: शाळा आहे की डान्स बार? रात्रभर महिलांना नाचवलं, लहान मुलांसमोर अश्लिल हावभाव; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com