Viral Video News: पंचाईत झाली! गर्लफ्रेंडला पळवायला आला पण ऐनवेळी गाडीने दिला धोका; अखेर घरच्यांनी पकडले अन्...| व्हिडिओ

Funny Viral Video News: ऐनवेळी गाडीने धोका दिल्याने 'या' फसलेल्या लवस्टोरीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video News:
Viral Video News: Saamtv
Published On

Viral Video News: सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी पोटधरुन हसायला लावतात तर कधी आश्चर्याचा धक्का देतात, सध्या अशाच एका फसलेल्या लवस्टोरीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

गर्लफ्रेंडला पळवून न्यायला आलेला तिचा प्रियकर आणि ऐनवेळी त्याच्या गाडीने धोका दिल्याने झालेली फजिती दाखवणारा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला असून नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेवू....

Viral Video News:
Jalgaon Accident News : शाळेतून आईसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीवर काळाचा घाला; भरधाव डंपरची धडक

काय आहे व्हिडिओ?

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं काही सेम असतं असे म्हणतात ते काही खरं नाही. बहुतेकदा मुलांच्या लवस्टोरीला घरच्यांचा विरोध असतो. त्यामुळे ते पळून जावून लग्न करण्याचा मार्ग निवडतात. अलिकडच्या काळात लव्ह मॅरेजचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.पण घरच्यांच्या मनाविरुद्ध जावून लग्न करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका पळून चाललेल्या तरुण- तरुणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हे दोघेही घरातून पळून जाण्याची संपूर्ण तयारी करतात. अगदी घराबाहेर पडून गाडीवरही बसतात. पण ऐनवेळी गडबड होते आणि गाडीच काही केल्या सुरू होत नाही. त्यानंतर या दोघांची चांगलीच फजिती होते.

Viral Video News:
Jalgaon Accident News : शाळेतून आईसोबत घरी जाणाऱ्या चिमुकलीवर काळाचा घाला; भरधाव डंपरची धडक

ऐनवेळी गाडीनं दिला धोका..

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण तरुणीला घरातून पळून घेऊन जाण्यासाठी आल्याचे दिसत आहे. ती तरुणी बॅग वगैरे घेऊन पळत त्या तरुणाकडे येते. तो तरुण तिची बाइकवर वाट पाहत असतो.

मात्र ऐनवेळी त्याची बाइक काही केल्या सुरु होत नाही. त्या तरुणीचे घरचे काठी घेऊन तिच्या पाठलाग करत असतात. ज्यानंतर त्या बिचाऱ्या तरुणाला गाडी सोडून पळावे लागते. आणि त्याची गर्लफ्रेंडही घरच्यांच्या हाती लागते.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

तरुण- तरुणीची ऐनवेळी झालेल्या फजितीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून अनेक अजब सल्लेही तरुणाला दिले आहेत. काही जणांनी पळून जायच्या आधी गाडीतरी.. सर्विसिंग करायची अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे तर अनेकांनी भावासोबत असं व्हायला नको होतं अशीही प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com