Fact Check: तुम्ही खाताय प्लास्टिकची अंडी? अंडी बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल

Plastic Eggs Viral Claim Debunked; आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता बाजारात प्लास्टिकची अंडी आल्याचा दावा करण्यात आलाय...अंडी बनवतानाचा व्हिडिओ समोर आल्याने सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण झालीय...आपण खातोय ती अंडी खरी आहेत की बनावट? असा प्रश्न उपस्थित होतोय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...
VIRAL PLASTIC EGGS CLAIM FACT CHECK
VIRAL PLASTIC EGGS CLAIM FACT CHECKsaam tv
Published On: 

हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल...प्लास्टिकची अंडी बाजारात विक्रीला आल्याचा दावा करण्यात आलाय...बघा, कशाप्रकारे प्लास्टिकची अंडी बनवली जातायत आणि हीच अंडी आपण खातोय असा दावा केल्यानं खळबळ उडालीय...हा आरोग्याचा विषय असल्याने खरंच अशा प्रकारे अंडी बनवली जातायत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने व्हिडिओ पाहून भीती निर्माण झालीय...कारण, अशी प्लास्टिकची अंडी बनवत असतील तर आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो...भयानक आजारही होऊ शकतात...बरेच जण अंडी आवडीने खातात...यामुळे बाजारात अशी प्लास्टिकची अंडी विक्रीला आलीयत का...? असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...खरंच अशी अंडी बाजारात आलीयत का...? प्लास्टिकची अंडी बनवणं शक्य आहेत का...? अशी अंडी बनवणाऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो का...? असे प्रश्न उपस्थित होत असल्याने आम्हीही याची माहिती मिळवली...त्यावेळी FSSAI ने एक याबाबत व्हिडिओ जारी केलाय...

अंडं खरंच खाण्यायोग्य आहे की नाही, हे तपासायचं असेल तर एक ग्लास पाण्यात अंडं टाका... ताजे अंडं हे भांड्याच्या तळाशी जाऊन बसतं...जुनं आणि शिळं अंडं हे तरंगतं...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

प्लास्टिक अंड्यांचा व्हायरल दावा खोटा

प्लास्टिकची अंडी बनवणं शक्य नाही

अंडी जुनी झाल्यानंतर त्यांची रचना कमकुवत होते

त्यामुळे पिवळा आणि पांढरा भाग सहज मिसळतो

त्यामुळे सोशल मीडियावर प्लास्टिकच्या अंड्यांसंबंधी येणाऱ्या कोणत्याही अफवांवर आणि भीतीदायक व्हिडिओवर विश्वास ठेवू नका...पाणी घ्या, चाचणी करा आणि खात्री करा...त्यामुळे बाजारात प्लास्टिकची अंडी विक्रीसाठी आल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com