Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

payment delay : तुम्हाला वेळेत पगार मिळाला नाही तर तुमच्या बॉसला जेल होऊ शकते...होय, 7 तारखेला पगार मिळाला नाही तर कारवाई होऊ शकते असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Salary
Salary newsSaam tv
Published On

7 तारखेला जर पगार मिळाला नाही तर तुमच्या बॉसला जेल होऊ शकते असा दावा करण्यात आलाय...कारण, तसा काय आहे आणि जर 7 दिवसात म्हणजे पगार जर 31 तारखेला मिळत असेल आणि पगार थकवला तर 7 तारखेपर्यंत मिळायलाच हवा...नाहीतर तुमच्या बॉसला जेल होऊ शकते असा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय...

हा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्याने खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? 7 तारखेला म्हणजे 7 दिवसात पगार न दिल्यास बॉसला जेल होऊ शकते का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती ही कायदेतज्ज्ञ देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी कायदेतज्ज्ञांना भेटले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली...

Salary
Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

7 दिवसात पगार न मिळाल्यास बॉसला जेल होत नाही

1936 चा कायदा म्हणजे वेतन देय कायदा

कर्मचाऱ्याला वेतन न दिल्यास डायरेक्ट जेल होत नाही

लेबर कमिश्नरकडे अर्ज केल्यास बॉसला दंड बसू शकतो

दीड ते साडेसात हजारपर्यंत मालकास दंड होतो

Salary
Bihar Election Result : बिहारचा पहिला अधिकृत निकाल; JDU च्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय

कर्मचाऱ्यांकडे ऑफर लेटर, बँक व्यवहार, ईमेल किंवा चॅट रेकॉर्ड जपून ठेवावे लागतात...तक्रारीदरम्यान हे पुरावे द्यावे लागतात... बॉसने कर्मचाऱ्याचा पगार परत दुसऱ्यांदा थांबवल्यास एक महिना ते सहा महिन्यांपर्यंत कायद्यात जेलची तरतूद आहे...पण या सगळ्या प्रक्रियेला कामगार आयुक्तांकडे दाद मागावी लागेल...त्यामुळे आमच्या पडताळणीत 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल होऊ शकते हा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com