Fact Check: छत्रपती संभाजीनगरमध्ये भूत? भुताच्या व्हिडिओमुळं नागरिकांमध्ये दहशत

Sambhajinagar Viral Ghost Video Fact Check Truth: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता संभाजीनगरात भूत फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय...एका गाडीवर भूत असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Truth behind the viral ghost video on Khultabad road
Truth behind the viral ghost video on Khultabad roadsaam tv
Published On

...हाच तो व्हिडिओ आहे, जो सध्या व्हायरल होतोय...एका चालत्या गाडीवर काहीतरी विचित्र दृष्य दिसतंय... व्हिडिओत दिसत असलेलं संभाजीनगरच्या खुलताबाद रस्त्यावरील भूत आहे असा दावा करण्यात आलाय...या दाव्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय...

संभाजीनगरात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...घृष्णेश्वर मंदिर, दौलताबाद किल्ला आणि भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात...यामुळे हा व्हिडिओ पाहून लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय...पण, खरंच हा व्हिडिओ संभाजीनगरमधील आहे का...? या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...आमच्या प्रतिनिधींनी हा व्हिडिओ संभाजीनगरातील अनेकांना दाखवला...

व्हायरल व्हिडिओत दिसत असलेलं भूत नाही

संभाजीनगर खुलताबाद मार्गावर अशी घटना घडली नाही

पर्यटकांनी कुठल्याही प्रकारचं भयभीत होऊ नये

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

भूत वगैरेही काहीही नसतं...सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काही लोक अशा प्रकारचे व्हिडिओ एडिट करतात...आणि इतरांना घाबरवलं जातं...अनेकजण यावर विश्वासही ठेवतात...त्यामुळे असे व्हिडिओ आल्यास सत्यता पडताळल्याशिवाय पुढे शेअर करू नका...आमच्या पडताळणीत संभाजीनगरात भूत दिसल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com