हा व्हिडिओ बघा, या व्हिडिओत रेल्वेतून रिक्षा नेतानाचा हा व्हिडिओ आहे...हा व्हिडिओ पाहून मराठी येत नसल्याने भैय्ये रेल्वेत रिक्षा टाकून पळाल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...सध्या राज्यात मराठी येत नसलेल्या रिक्षा, टॅक्सी चालकांवर कारवाई केली जातेय...त्यामुळेच धसका घेतल्याने हा रिक्षा चालक रिक्षाच घेऊन युपीत पळाल्याचा दावा करण्यात आलाय...
हा व्हिडिओ मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस इथला आहे...LTT ते वाराणसी अशी ट्रेन असून, ट्रेन नंबर 01073/74 असा दिसतोय...त्यामुळे खरंच भैय्ये रिक्षासकट मुंबईतून युपीत पळाले का...? असा प्रश्न विचारला जातोय...कारण, राज्यात सध्या आरटीओकडून जोरदार रिक्षा, टॅक्सी चालकांची तपासणी सुरू आहे...ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांचं लायसन्स काही महिन्यांसाठी निलंबित केलं जातंय...त्यामुळे हा दावा ऐकून अनेकांना खरं वाटतंय...आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...खरंच अशा प्रकार रिक्षा दुसऱ्या राज्यात घेऊन जाणं शक्य आहे का...? या भैय्याचा व्हिडिओ खरा आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
मराठी येत नसल्याने भैय्ये युपीत पळालेले नाही
रिक्षाचालक पाल वैयक्तिक कारणामुळे गावी गेले
हा व्हिडिओ एप्रिल महिन्यातील आहे
रेल्वेतून रिक्षा नेली हा व्हिडिओ खरा
काम झाल्यानंतर पुन्हा ऑगस्टमध्ये मुंबईत परतले
रिक्षाचालक विजय प्रताप पाल हे एप्रिलमध्ये वैयक्तिक कारणांसाठी आपल्या गावी गेले होते...आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात परतले...व्हिडिओत दिसत असलेली ही एक विशेष ट्रेन आहे ती सध्या धावत नाही...
एप्रिल महिन्यात रिक्षा पार्सल म्हणून बुक करण्यात आली होती आणि ती लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी असा प्रवास करणार होती...युपीत ई-रिक्षांची संख्या वाढत असल्यामुळे, तिथे पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं...त्यामुळे 7 ऑगस्टला हा रिक्षा चालक रिक्षासह महाराष्ट्रात परतला...
मात्र, मराठी येत नसल्याने भैय्ये रिक्षासह पळाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.