
Funny Viral Video: भारतात दरदिवशी अनेक विदेशी पर्यटक येत असतात. विदेशी पर्यटक भारतात आल्यानंतर अनेक ब्लॉग शुट करत असतात. मग त्यातील अनेक गमतीदार गोष्टी ते सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क वाराणसीच्या घाटावर एक विदेशी महिला चहाचा व्यवसाय करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी भारतातील लोकांचे टॅलेन्ट आपल्याला व्हायरल व्हिडिओमधून पाहण्यासाठी मिळतात तर कधी विदेशी पर्यटकांनी शेअर केलेल्या गंमतीदार गोष्टी पाहण्यासाठी मिळतात,सध्या व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओही विदेशी महिलेचा आहे, मात्र जो पाहिल्यानंतर तुम्ही मन भरुन नक्की हसायला येणार.
व्हिडिओत तुम्ही सुरुवातीस पाहू शकता, जो व्यक्ती आहे जो एक फुड ब्लॉगर असल्याचे सांगतो आणि म्हणतो असतो, वाराणसी घाटावर एक महिला चहा विकत आहे त्यानंतर तो त्या चहा विक्रेत्या विदेशी महिलेकडे चहा मागतो मात्र ति त्याला चहा देण्यास नकार देते पंरतू पुढे काय घडते ते एकदा व्हायरल होत असलेला पूर्ण पहा.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेल्या अनेक दिवसांपासून पाहण्यास मिळत आहे. परंतू तो इन्स्टावरील ''videshi__indian'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. तब्बल १ लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.
व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''वाराणसीमध्ये चहा विकताना परदेशी व्यक्ती दिसली'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''देश बदलत आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,'जर अशा परदेशी महिलांनी चहा बनवायला सुरुवात केली तर भारतातील चहा विक्रेते बेरोजगार होतील'' अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.