
Vengurla News: वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथे एका धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक शिरोडकर कुटुंबियांना जमिनीच्या वादातून मारहाण करण्यात आली असून यासंदर्भात एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ही घटना केवळ जमिनीच्या वादापुरती मर्यादित न राहता, बाहेरील राज्यातील महिलांना आणून स्थानिक महिलांवर हल्ला करण्यापर्यंत पोहोचली आहे. या घटनेने संपूर्ण कोकणात संताप व्यक्त होत आहे.
दाभोली गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबियांच्या जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद येथील यशवंतकुमार अमरलाल ठक्कर या व्यक्तीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने गुजरातहून परप्रांतीय महिलांना बोलावून घेतले आणि त्यांच्यामार्फत गावातील स्थानिक महिलांवर हात उगारला. ही घटना इतकी गंभीर होती की, शिरोडकर कुटुंबातील महिलांवर(Women) थेट हल्ला झाला, त्यांना जबरदस्तीने खाली खेचण्यात आले व शारीरिक मारहाण करण्यात आली.
या घटनेचा व्हिडिओ माजी आमदार वैभव नाईक यांच्या हाती लागला असून त्यांनी तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला. या व्हिडिओत महिलांवर झालेली मारहाण स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून लोकांचा संताप उफाळून आला आहे.
या गंभीर घटनेबाबत वेंगुर्ला पोलीस(Police) ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न शिरोडकर कुटुंबीयांनी केला. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच माजी आमदार वैभव नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते परशुराम उपरकर यांनी या पीडित कुटुंबासह थेट पोलीस ठाण्यात धडक दिली.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.