Vande Bharat Train Restaurant: विदाऊट तिकीट फूल जेवण!,'वंदे भारत'ट्रेनमध्ये पुरवा जिभेचे चोचले अन् पैसेही वाचवा

Vande Bharat Train Restaurant Viral Video: हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलला थेट वंदे भारत ट्रेनची थीम दिलीये. या थीमने हे हॉटेल बनवण्यात आलं आहे.
Vande Bharat Train Restaurant
Vande Bharat Train RestaurantSaam TV
Published On

Restaurant Viral Video:

भारतात वंदे भारत ट्रेनला सुरूवात झाल्यापासून या ट्रेनमधून एकदा तरी प्रवास करावा असं अनेकांना वाटतं. तुम्हालाही वंदे भारत ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि या ट्रेनचा अनुभव घ्यायचा असेल तर तो तुम्ही विदाऊट तिकीट देखील घेऊ शकता. इतकंच नाही तर तुम्ही विदाऊट तिकीट वंदे भारत ट्रेनमध्ये पोटभर जेवणही करू शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vande Bharat Train Restaurant
Viral Video: जयपूरमध्ये पेट्रोलपंप कर्मचाऱ्याकडून रशियन महिलेशी गैरवर्तन; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेली ही वंदे भारत ट्रेन गुजरातच्या सुरतमधील एक हॉटेल आहे. हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलला थेट वंदे भारत ट्रेनची थीम दिलीये. या थीमने हॉटेल बनवण्यात आलं आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनमध्ये तिकीट न काढता जेवलात तरी तुम्हाला जेवणाचं बील मात्र भरावं लागणार आहे.

Vande Bharat Train Restaurant
Man Falls In Train: ट्रेनच्या दरवाजात तरुणाची जिवघेणी स्टंटबाजी; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

'ला पिज्जा ट्रेनो' असं या हॉटेलचं नाव आहे. 'पिज्जा ट्रेन' असा याचा हिंदी अर्थ आहे. यातील डायनिंग परिसर हा ट्रेनच्या कोचसारखाच आहे. बाहेरून देखील ट्रेन संपूर्ण वंदे भारत सारखी आहे. @Chatoraankit या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स मिळालेत.

हॉटेलमध्ये तुम्हाला अनलिमीटेड फूड देखील उपलब्ध आहे. येथे 2 प्रकारचे सूप, 7 प्रकारच्या चाट, 10 प्रकारचे थंड कोशिंबीर, 2 प्रकारचे गार्लिक ब्रेड, ३ प्रकारचे पिझ्झा, दक्षिण भारतीय, पंजाबी पदार्थ, अनलिमीटेड कोल्ड्रिंक्स, 1 मिठाई मिळते. दुपारच्या जेवणाची थाळी येथे 269 रुपयांना तर रात्रीच्या जेवणाची थाळी 289 रुपयांना मिळते.

भारतात वंदे भारत ट्रेन 4 वर्षांपूर्वी 15 फेब्रुवरी 2019 रोजी लाँन्च करण्यात आली. ही ट्रेन प्रति तास ९५ किलोमीटरच्या गतीने धावते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये वंदे भारत ट्रेनची जोरदार चर्चा आणि यातून प्रवास करण्याची उत्सुकता आहे.

Vande Bharat Train Restaurant
Viral Video: 'पहाडी सॉन्गवर' बाप-लेकीचा जबरदस्त डान्स, आई बघतच राहिली, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com