ज्या मुलाला दत्तक घेतलं, त्याच्याच बायकोनं वृद्ध सासूला मध्यरात्री रस्त्यावर सोडलं

Elderly Woman Abandoned: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एका वृद्ध महिलेला ज्या मुलाला दत्तक घेतलं त्याच्याच बायकोनं मध्यरात्री रस्त्यावर सोडलं दिलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Elderly Woman Abandoned
Saam Tv
Published On

Ayodhya Shocking Video: उत्तर प्रदेशातील अयोध्यामधील एका धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावर विवश अवस्थेत आढळते आणि दावा करण्यात येतो की, ही महिला तिच्या गोद घेतलेल्या मुलाने व सुनने घराबाहेर काढली होती. तब्बल ९ तास रस्त्यावर तडफडल्यावर अखेर या वृद्धेचा मृत्यू झाला. सदर घटना समजताच पोलिसांनी दत्तक घेतलेल्या मुलासह त्याची पत्नीला अटक केली आहे.

व्हिडिओमुळे उघड झाली क्रूरता

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ(Video) व्हायरल झाला, ज्यामध्ये एक वृद्ध महिला गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेली दिसत होती. काही स्थानिक नागरिकांनी तिच्या मदतीचा प्रयत्न केला आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच ९ तासांनी तिचा मृत्यू झाला. ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस तपासात मोठा खुलासा झाला.

मृत महिला अयोध्येतील रहीवासी असून तिने काही वर्षांपूर्वी एका मुलाला दत्तक घेतले होते. या मुलावर तिने खुप प्रेम केले, त्याचे लग्नही एका तरुणीसोबत करुन दिले. मात्र, लग्नानंतर घरात वातावरण बदलू लागले. सुनेने सासूवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आणि तिच्या दत्तक घेतलेल्या मुलानेही पत्नीच्या दबावाखाली येत आईकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.

या वृद्धेची प्रकृती काही काळापासून खराब होती. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती, तेव्हा तिच्या सुनबाईने आणि पतीने तिला घरातून बाहेर काढून रस्त्यावर फेकून दिले. रात्रीच्या वेळी ती महिला रस्त्यावर तडफडत पडलेली होती. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Camera)घटना कैद झाली आहे. स्थानिकांनी तातडीने अयोध्येतील जिल्हा रुग्णालयात वृद्धेला दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र ती खूपच अशक्त झाली होती. ९ तास रुग्णालयात उपचार घेत असताना अखेर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपींना अटक

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच अयोध्या पोलिसांनी तपास सुरू केला आणि सदर व्हिडिओची पडताळणी केली. पोलीस तपासात स्पष्ट झाले की वृद्धेला तिच्या दत्तक घेतलेल्या मुलाने आणि त्याच्या पत्नीनेच घराबाहेर काढले होते. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Elderly Woman Abandoned
बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com