Girl Fingers Stuck In Bench
Shocking VideoSaam Tv

Shocking Video: उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली

Girl Fingers Stuck In Bench: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका चिमुकली आहे. जी उद्यानात खेळण्यासाठी आली होती, मात्र त्यानंतर भयंकर घडलं आहे.
Published on

Noida News: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहानग्यांना खेळायला नेणं ही बऱ्याच पालकांसाठी रोजचीच गोष्ट झाली आहे. शहरातील विविध उद्याने दररोज लहानग्यांनी फुलून गेलेली पाहायला मिळतात. पण, याच खेळाच्या आनंदात एका चिमुकलीसाठी एक त्रासदायक आणि धक्कादायक अनुभव उदयाला आला. ही घटना पालकांमध्ये चिंता निर्माण करणारी आहे.

उत्तर प्रदेशमधील नोएडा भागात असलेल्या एका उद्यानात ही घटना घडली आहे. अवघ्या सात वर्षांची चिमुकली(Little Girl) संध्याकाळी उद्यानात गेली होती. झोके, स्लाइड्स यांचा आनंद घेतल्यानंतर ती एका बेंचवर बसली. त्यानंतक खेळता खेळता तिचं लक्ष बेंचवरील छिद्रांकडे गेलं आणि ती त्यात बोट घालून पाहू लागली. मात्र, तिचं बोट त्या धातूच्या बेंचमधील छिद्रात अडकून बसलं.

सुरुवातीला आईने तिला समजावत हळूहळू बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोट अडकल्यामुळे चिमुकली वेदनांनी रडू लागली. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील इतर नागरिक आणि सुरक्षारक्षक धावून आले. प्रयत्न करूनही बोट बाहेर निघेना. अखेरीस उद्यान प्रशासनाने अग्निशमन दलाला संपर्क साधला.

सध्या या घटनेचा व्हिडिओ(Shocking Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओला पाहून प्रत्येक पालक सावध झाला आहे. नुकताच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील pehli_ettela_news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेल्यानंतर कमेंटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''खरंच पालकांच लक्ष नसेल तर मुलं असं काही तरी करतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नुसतीच करामत पोर करतात राव'' तर काहींनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Girl Fingers Stuck In Bench
Viral Video: दुर्दैवी घटना! घरासमोर पावसात खेळणाऱ्या चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू; हृदयद्रावक व्हिडिओ आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com