Bihar Train Fighting: ट्रेनमध्ये बिहारी स्टाइलनं कुटाकुटी; सीटसाठी लाथाबुक्क्यांनी हाणामारी, VIDEO व्हायरल

Viral Video: या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. दोघांची हाणामारी त्यांच्यासोबत असलेल्या आणखीन एक व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलीये.
Men Fight In Train
Men Fight In TrainSaam TV
Published On: 

Train Fight Viral Video:

ट्रेनमधील मारामारी आणि भांडणाचे व्हिडीओ आपण पाहिले असतील. अनेकदा फक्त सीटवर बसण्यासाठी भांडण होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्याला हवी असलेली सीट मिळवण्यासाठी दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झालीये. (Latest Marathi News)

Men Fight In Train
Blue Dosa Video: खाते रहो! सोशल मीडियावर Viral झालाय निळा डोसा; VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल...

हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, ट्रेनमधील अपर बर्थवर एक तरुण आधीच बसलेला आहे. त्याच्या शेजारी दुसरा एक तरुण येतो. त्याला देखील याच सीटवर बसायचं असतं. त्यामुळे या दोघांमध्ये एकाच सीटवरून वाद होतो.

पुढे या वादाचे रुपांतर हाणामारीत होते. दोघांची हाणामारी त्यांच्यासोबत असलेल्या आणखीन एक व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलीये. सीटवरून भांडताना दोन्ही तरुणांना हा व्यक्ती शांत बसण्यास सांगत आहे. मात्र दोघेही एकमेकांवर तुटून पडतात. लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करतात.

दोघांची भांडणे सुरू असताना ट्रेनमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला चार लाखांहून अधिल लोकांनी पाहिलंय. नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करत आहेत.

@gharkekalesh या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. एका यूजरने लिहिलं की,एकदम जबरदस्त फाइट. तर आणखीन एकाने अशा पद्धतीने ट्रेनमध्ये हाणामारी करणे रिस्की असल्याचं म्हटलंय.

Men Fight In Train
Viral Dance Video: कडक रे! 'बेशरम रंग' गाण्यावर मुलगा असा थिरकला, प्रेक्षकांकडून टाळ्या अन् शिट्ट्यांचा पाऊस; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com