Fact Check: अबब...रिक्षावाला कमवतो महिन्याला 8 लाख? रिक्षा न चालवताच कमवतो लाखो रुपये?काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Mumbai Rickshaw Driver: एक रिक्षावाला रिक्षा न चालवताच महिन्याला तब्बल 5 ते 8 लाख रुपये कमावतोय...होय, असा दावा करणारा मेसेज आणि त्या रिक्षावाल्याचा फोटो व्हायरल होतोय...पण, हा रिक्षावाला महिन्याला एवढे पैसे कसे काय कमावतो...? यामागचं सत्य काय याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहयात...
Mumbai news
Mumbai newssaam tv
Published On

.मुंबईतला एक रिक्षावाला महिन्याला तब्बल 5 ते 8 लाखांची कमाई करतोय...सोशल मीडिय़ावर या रिक्षावाल्याची तुफान चर्चा सुरूये...महिन्याला तब्बल 5 ते 8 लाख म्हणजेच दिवसाला 15 ते 20 हजार रुपये हा रिक्षावाला कमावतोय...हा रिक्षावाला रिक्षा न चालवताच एवढे पैसे कसे कमावतो हाच प्रश्न सगळ्यांनाच पडलाय...पण, खरंच रिक्षावाला महिन्याला एवढे पैसे कमावतो का...? व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात

व्हिसाच्या अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेलो होतो. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी अडवलं आणि बॅग आत घेऊन जाण्यास मज्जाव केला.त्यावेळी रिक्षा चालकाने लॉकर सेवा दिली. रोज 20-30 ग्राहक रिक्षावाल्याला मिळतात.ज्यातून दिवसाला 20 ते 30 हजार रुपयांची कमाई होते.रिक्षावाला महिन्याला 5-8 लाख रुपयांचा कमाई करतो.

राहुल रुपानी यांनी पोस्ट करून हा दावा केलाय...त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला...रिक्षा न चालवता हा रिक्षावाला कसे काय इतके पैसे कमावतो...? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती...त्यामुळे आमच्या व्हायरल टीमने थेट बांद्र्यामध्ये जाऊन रिक्षा चालकाचा शोध घेतला...आणि खरंच रिक्षा न चालवताच महिन्याला तो 5 ते 8 लाख रुपये कमावतो का...? याची आम्ही माहिती विचारली...

व्हिसा इंटरव्यूसाठी अनेक अमेरिका दूतावासात येत असतात

इंटरव्यूला आलेल्यांची बॅग, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वस्तू असतात

दूतावासाची परवानगी नसल्याने ऐनवेळी धावपळ उडते

गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षा चालक मदत करतात

लॉकरसाठी पूर्ण दिवसाचे 1 हजार रुपये घेतात

लॉकरचे 600 रुपये आणि बॅग आणायचे सोडायचे

400 रुपये असे हजार रुपये मिळतात...मात्र, मुंबईतील रिक्षावाला महिन्याला 8 लाख रुपये कमावत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com