..100 आणि 200 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार असा दावा करण्यात आलाय...खरंच या दोन्ही नोटा चलनातून बाद होणार का...? 100, 200 च्या नोटा चलनातून का बंद होणार आहेत...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...कारण, 500 ची नोट बंद आणि 2 हजाराची नोट चलनात आली... त्यावेळी सुट्ट्या पैशांचे वांदे झाले होते... आता या दोन्ही नोटा बंद झाल्या तर काय होईल? या बदल्यात नवीन नोटा येणार आहेत का...? 100 आणि 200 ची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण होऊ शकते...मात्र, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार. आणखी नवीन नोटा चलनात येणार. या नोटा चालणार नाहीत.
हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...पैसे हे सगळ्यात महत्वाचा विषय...त्यात सर्व सामान्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अत्यंत महत्त्वाच्या आहे...आता ऑनलाईन पेमेंटमुळे शहरी भागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलाय... मात्र, ग्रामीण भागात अजूनही बर्याच ठिकाणी कॅश व्यवहार होतात...एकवेळ मोठी नोट बंद झाली तरी चालेल मात्र छोटी नोट बंद झाल्यास खरेदी वेळी सुट्टे पैसे नसतील तर खूप अडचण होते...त्यामुळे याची सत्यता पडताळून नक्की या नोटांचं काय होणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती मिळवली... आमच्या टीमने थेट आरबीआयशी संपर्क साधला...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार नाही
RBI दोन्ही नवीन नोटा चलनात आणणार
नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल
जुन्या 100 आणि 200 च्या नोटाही सुरूच राहतील
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 100,200 ची नोट जारी केली जाणार आहे...नवीन नोटा आधीच्या नोटांसारख्याच असतील... जुन्या नोटाही चलनात राहतील...मात्र, नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.