Viral Video: तात्यांचा विषय लय हार्ड! घातली ३१,००० रुपयांची नागिन चप्पल: अख्ख्या साताऱ्यात चर्चा

Satara Viral Video: सातारा जिल्हा म्हटलं की विविध गोष्टी डोळ्यांसमोर येतात. काही गोष्टी सोशल मीडियावर तुफानही व्हायरल होतात. नुकताच सोशल मीडियावर साताऱ्यातील एका तात्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Satara Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

31 Thousand Rupees Footwear: सातारकरांचा नाद नाय करायचा. सातारच्या एका अवलियाने एक दोन नाय तर ३१ हजार रुपयांची चप्पल घातलीय ती पण एकदम दमदार. सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. चला तर आज पाहुयात हा नेमका अवलिया कोण आहे?

नेमके खास तरी काय?

सातारच्या(Satara) प्रसिद्ध झालेल्या मंडळींचं नाव केराप्पा आण्णा कोकरे आहे. व्हायरल झालेल्या चप्पलचे नाव ३१ हजार रुपयांची नागीन चप्पल असे आहे. जी तिच्या आवाजामुळे फेमस झाली आहे. ही चप्पल फक्त साधी नाही, तर ती सळसळणारी आणि खुळखुळ वाजणारी आहे. चप्पल घालून सातारच्या केराप्पा तात्याचा स्टाइलही काही वेगळाच.

साताऱ्यातील लोकांसाठी तात्यांची ही नागीन चप्पल म्हणजे एक चालते फिरते अ‍ॅट्रॅक्शन ठरत आहे. रस्त्यांवर ते जिथे चालतात, तिथे चप्पल पाहणाऱ्यांची गर्दी जमते आणि लोक फोटो काढतात शिवाय व्हिडीओही करतात. विशेष म्हणजे, त्यांच्या स्टाइलचं कौतुक करतात. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

लोकांची प्रतिक्रिया काय आहे?

व्हिडिओ व्हायरल(Video) होताच पाहणारा प्रत्येकजण आश्चर्यचकित झालेला आहे शिवाय अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''नाद खुळा राव'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''सातारी लोक कुठे काय करतील सांगता येत नाही'' शिवाय काहींनी म्हटलं आहे,''पहिल्यांदा पाहिलं असं काही'' अशा प्रकारे विविध मतं लोकांनी मांडली आहेत.

टीप: साताऱ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Satara Viral Video
Viral Video: कराडची सुपर आजीं; ट्रॅफिकमधून रीक्षा चालवतेय बुंगाट; पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com