Viral Video: कहरच रे! एका गाडीवर ७ जण, सोबत २ कुत्री अन् कोंबडा; VIDEO पाहून डोक धरालं

Bike Stunt Video: एकाच गाडीवर घरातील सात जणांसोबत कुत्री, अन् कोंबडा घेवून चाललेला हा सुसाट प्रवास सध्या चर्चेत आला आहे.
Bike Stunt Viral Video
Bike Stunt Viral VideoSaamtv
Published On: 

Viral Video News:

दोनपेक्षा जास्त लोकांना घेवून बाईक प्रवास करता येत नाही.. हा नियम तुम्हालाही माहित असेल. परंतु वाहतुकीचा नियम न पाळता अनेकदा चार- चार लोकांना गाडीवर फिरवल्याचेही व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही थक्क व्हालं. काय आहे हे नेमकं प्रकरण, जाणून घ्या...

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला एकापेक्षा एक चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी बाईक स्टंट, कधी भयंकर अपघात तर कधी भन्नाट डान्सचे थक्क करणारे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, पण असा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहिला नसेल.

हा व्हायरल व्हिडिओ एका कुटुंबाचा असून ते सर्वजण एकाच गाडीवरुन प्रवास करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या पुढे दोन मुले पेट्रोल टाकीवर बसली आहेत. मागे, पत्नी आणि तिच्या मागे तीन मुले बसलेली दिसत आहेत.

विशेष म्हणजे या सात लोकांसह गाडीवर त्यांचे भलेमोठे गाठोडे, दोन कुत्री, आणि एक कोंबडाही ठेवल्याचे दिसत आहे. एकाच गाडीवर घरातील सात जणांसोबत कुत्री, अन् कोंबडा घेवून चाललेला हा सुसाट प्रवास सध्या चर्चेत आला आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरीही थक्क झाले असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी त्याच्या या कौशल्याचे कौतुक केले आहे. काही जणांनी अशामुळे अपघात होतात, असा धोकाही सांगितला आहे. लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे. (Latest Marathi News)

Bike Stunt Viral Video
Bhandara News : अंत्यसंस्कारासाठी जमलेल्यांनी अचानक काढला पळ; स्मशानभूमीत घडले भयानक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.