
School Children Video: शाळा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील जिव्हाळ्याचा विषय असतो.शाळेच्या प्रत्येक आठवणी आयुष्यभर सोबत असतात.त्यातही शाळेतील मित्र आणि शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या आठवणी कायम न विसरणाऱ्या आहेत.सोशल मीडियावर शाळेतील बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे सर्व व्हिडीओ पाहून अनेकदा शाळेची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थ्यांनी मिळून असं काही करतात जे पाहून तुम्हीही पठ्ठयाचे कौतुक कराल.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला शाळा दिसत असून शाळेतील वर्गात काही बॅंचवर काही विद्यार्थी बसलेले आहेत.मग काय शेवटच्या बॅंचवर बसलेले हे विद्यार्थी कंपास पेटी, पाण्याची बाटली आणि शाळेच्या बॅंचचा वापर करुन अतिशय उत्कृष्टरित्या वादन सादर करतात.व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही नक्की डान्स करण्यासाठी भाग पडाल.
सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून kalakaaars या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तासाभरात लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून लोकांनी हडारो लाईक्स केलेले आहेत.ऐवढेच नाही तर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''तुमच्या शाळेतील मित्रांना हा व्हिडिओ टॅग करा''असे लिहिले आहे.
व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''सर्व आठवणी आठवणीच राहिल्या'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''मुलांचा नाद खुळा''तर अनेकांनी शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्या अशा कमेंट केलेल्या आहेत.
टीप: शाळेतील विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.