Bandra Bandstand Viral VIdeo News: सध्या देशभरात पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र दिसत आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून मोठ्या दुर्घटनाही घडल्याचे समोर येत आहे.
अशावेळी पावसाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे किती मोठा अनर्थ होवू शकतो.. याचाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral Video News)
काय आहे व्हायरल व्हिडिओ...
सध्या पावसाळ्याचे (Rainy Days) दिवस आहेत. अनेकजण पावसाळ्यात ट्रेकिंगला (Traking) जाण्याचा प्लॅन करत असतात. अशावेळी उत्साहातही सावधगिरी आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मात्र अशा ठिकाणी अनेकदा नसते धाडस केले जाते आणि अनर्थ घडतो. सध्या मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवरील काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे.
या व्हिडिओमध्ये (Viral Video) मुलांच्या डोळ्यादेखत त्यांची आई पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे. मुले मम्मी. मम्मी म्हणत ओरडत असतानाच आईच्या सेल्फी काढण्याच्या मोहाने ही भयंकर दुर्घटना घडली. अंगावर काटे आणणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
सेल्फीच्या मोहाने घेतला जीव...
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे वाहत्या पाण्यात मध्यभागी बसून फोटो काढत असल्याचे दिसत आहे. पाण्याचा वेग इतका आहे की भल्यामोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळताना दिसत आहेत मात्र तरीही हे दोघे तशाही परिस्थितीत फोटो काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये त्यांची मुलेही किनाऱ्यावर उभे राहून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचे दिसत आहेत. मात्र त्यांचा हा हलगर्जीपणाच त्यांना महागात पडला. काही वेळाने मागून येणारा पाण्याचा प्रवाह दोघांनाही पाडतो. ज्यामुळे ते दोघेही पाण्यात वाहून जातात.
नेटकऱ्यांच्या भावूक प्रतिक्रिया...
डोळ्यादेखत आईला वाहून जाताना मुले मोठ्याने ओरडत असून त्यांचा आवाज काळीज पिळवटून टाकत आहे. एक छोटीशी चूक आणि हलगर्जीपणा किती महागात पडू शकतो. हेच या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून पावसाळ्यात फिरायला जाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.