Viral Dance Video: जबरदस्तच! चिमुकलीच्या कडक डान्सने केलं मार्केट जाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही धराल ठेका...

आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून डान्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत...
Viral Dance Video
Viral Dance VideoSaamtv
Published On: 

Cute Girl dance Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी ट्रेनमध्ये तर कधी भररस्त्यात अनेक जण डान्स करत व्हिडिओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर अशा तडफदार डान्सचे व्हिडिओ पाहून आपलेही पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत.

सध्या अशाच एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामधील मुलीचा कडक डान्स पाहून तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत. या डान्स व्हिडिओने सर्वांनाच भुरळ घातली आहे. (Viral Video News In Marathi)

Viral Dance Video
Buldhana News: धावत्या खाजगी बसमध्ये तरुण करताय मद्यपान; व्हिडिओ होतोय व्हायरल

डान्सने लावले वेड....

सोशल मीडियावर (Social Media) लहान्यांपासून मोठ्यापर्यंत नाचतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर ओपन केलं की आपल्याला असंख्य डान्स व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या सुंदर डान्सचा व्हिडिओ जोरदार (viral Video) व्हायरल होत आहे. लग्न समारंभात ही चिमुरडी हा डान्स करत आहे.

निळा रंगाचा ड्रेस आणि त्यावर क्यूट चेहऱ्यावर पिंक रंगाचा चष्मा असा भारी लूक केलेली चिमुकली इतरांसोबत गाण्यावर असा काही ठेका धरती की तिच्या गोड अदा पाहून सगळेच थक्क होवून जातात. तिच्या या डान्सच्या स्टेप्स अगदी मोठ्या लोकांनाही चकित करतील.. अशा आहेत.

चिमुकलीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून काही नेटकऱ्यांनी चिमुकलीचा डान्स पाहून मी थक्क झाल्याचे सांगितले आहे, तर काही जणांनी हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आयुष्याचा असा निरागस आनंद लुटता आला पाहिजे.. असे म्हणत डान्सचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.