Viral Video : फक्त मुली नाही तर मुलंही होतात 'बॅड टच'चे शिकार; शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली महिती, VIDEO व्हायरल

Good and bad touch Video : विविध विषय शिकवले जातात. गणित, विज्ञान, भुगोल, भाषा यांसह विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणही दिले जाते. यामध्ये गुड आणि बॅड टच शिकवणे काळाची गरज झाली आहे.
Teacher educates students touch
Viral VideoGood and bad touch Video

Teacher educates students touch :

शारीरिक शोषण हा गंभीर मुद्दा असून फक्त स्त्रीया नाही तर लहान मुलं देखील याचे शिकार बनतात. अनेक ठिकाणी शाळांमध्ये किंवा घरामध्ये लहान मुलींना गुडटच आणि बॅडटच बाबत माहिती दिली जाते. यातील फरक कसा ओळखायचा हे सांगितले जाते. अशात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Teacher educates students touch
BMC Teacher Vacancy: शिक्षकांसाठी मोठी बातमी! महापालिकेच्या शाळांमध्ये बंपर भरती, किती आहेत जागा? कोणत्या शांळामध्ये संधी?

एका शाळेमध्ये शिक्षिकेने फक्त विद्यार्थीनींना नाही तर विद्यार्थ्यांना देखील याबाबत महिती दिली आहे. तसेच गुड आणि बॅड टच कसा ओळखायचा याबाबत माहिती सांगितली आहे. फक्त मुली नाही तर लहान मुलं देखील शारीरिक शोषणाचे बळी ठरतात. अनेक ठिकाणी अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सोशल शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत ज्ञान देत आहे.

शिक्षिकेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पोस्ट केला आहे. शाळेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ज्ञान दिले जाते. विविध विषय शिकवले जातात. गणित, विज्ञान, भुगोल, भाषा यांसह विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणही दिले जाते. यामध्ये गुड आणि बॅड टच शिकवणे काळाची गरज झाली आहे.

राज्यासह देशात अनेक ठिकाणी लहान मुलींवरील बलात्काराच्या घटना समोर येतात. या घटनांना आळा बसावा यासाठी प्रत्येक वेळी लहान मुलांसोबत त्यांचे पालक किंवा चांगल्या व्यक्ती नसतात. मात्र मोठं संकट येण्याआधी एखादी व्यक्ती अशा पद्धतीने स्पर्श करत असेल आणि विद्यार्थ्यांना यामधील फरक कळत असेल तर ते वेळीच सावध होऊ शकतात.

सर्वत्र फक्त मुलींना याबाबत शिकवले जाते. मात्र मुलं देखील याचे बळी ठरतात. शिक्षिकेने मुलांना देखील या गोष्टी शिकवल्याने याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी या शिक्षिकेचं कौतुक केलं आहे. तसेच सर्वच शाळांमध्ये असे शिकवले पाहिजे असंही काही पालकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Teacher educates students touch
Kolhapur Crime News : कुप्रसिद्ध टाेळीच्या म्हाेरक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून 12 गुन्हेगार हद्दपार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com