Tamil Nadu Trending News: अबब! ९ लिंबूंची तब्बल २. ३६ लाखांना विक्री; नेमकं कारण काय?

9 lemons sold for Rs 2.3 lakh: तमिळनाडूतील विल्लूपुरम जिल्ह्यात एका दांपत्याने लिलावातून १ लिंबु तब्बल ५० हजार विकत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मंदिराच्या उत्सवानंतर लिलावात मांडलेले हे लिंबू दांपत्याने लाखो रुपयांनी विकत घेतले.
 9 lemons sold for Rs 2.3 lakh:
9 lemons sold for Rs 2.3 lakh:Saamtv

Tamil Nadu News:

तमिळनाडूमधून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. तमिळनाडूतील विल्लूपुरम जिल्ह्यात एका दांपत्याने लिलावातून १ लिंबु तब्बल ५० हजार विकत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मंदिराच्या उत्सवानंतर लिलावात मांडलेले हे लिंबू दांपत्याने लाखो रुपयांनी विकत घेतले. नेमके काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या.

तामिळनाडूतील विल्लुपुरम मंदिरात पांगुनी उत्तरम उत्सवाच्या शेवटच्या दिवशी नऊ लिंबांचा लिलाव करण्यात आला. या लिलावात 9 लिंबू 2.3 लाख रुपयांना विकले गेले. या लिंबांपासून बनवलेले लिंबूपाणी सेवन केल्याने वंध्यत्व दूर होते, अशी या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच इतकी किंमत मोजण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तिरुवन्नैनाल्लूर गावातील दोन टेकड्यांवर वसलेल्या या मंदिराला पांगुनी उठीराम उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने निपुत्रिक जोडपी भेट देतात आणि लिंबाच्या लिलावात भाग घेतात. पांगुनी उठीराम उत्सव नऊ दिवस चालतो, दररोज भाल्यावर लिंबू शिंपडला जातो. या परंपरेत मुख्य कार्यक्रम शेवटच्या दिवशी होतो. ज्यामध्ये मंदिर समितीद्वारे या लिंबांचा लिलाव केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 9 lemons sold for Rs 2.3 lakh:
Akola News : अकोल्यात बच्चू कडूंना महिलांचा घेराव; पाणी टंचाई प्रश्नावर महिला आक्रमक

यामध्ये उत्सवाच्या सणाच्या पहिल्या दिवशी भाल्याने टोचलेल्या लिंबाचे विशेष महत्त्व आहे, ते सर्वात शुभ आणि शक्तिशाली मानले जाते. त्यामुळे या लिलावात एका जोडप्याने हे लिंबु घेण्यासाठी तब्बल 50 हजार 500 रुपये मोजले. पांगुनी उथीराम उत्सवादरम्यान, जे या लिंबाची बोली लावतात आणि खरेदी करतात त्यांना विधीपूर्वक स्नान करून आणि मंदिराच्या पुजाऱ्यांसमोर गुडघे टेकून लिंबू दिले जाते.

 9 lemons sold for Rs 2.3 lakh:
Parbhani : परभणीत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध, 'आप'च्या रक्तदान शिबीरात 100 जणांचा सहभाग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com