Shocking Video: आधी बाचाबाची, मग एकमेकांना लाथा बुक्क्यांचा मार; संसदेत खासदारांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी

Taiwan Parliament Fight Viral Video : तैवानच्या संसदेत शुक्रवारी (ता. १७) खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद इतका वाढला, की खासदारांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
Saam TV
Taiwan Parliament Fight Viral VideoSocial Media Twitter
Published On

तैवानच्या संसदेत शुक्रवारी (ता. १७) खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद इतका वाढला, की खासदारांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओत खासदार एकमेकांवर तुटून पडल्याचं दिसून येतंय.

Saam TV
Bus Viral Video: हा तर वेड्यांचा बाजार! धावत्या बसमध्ये बांधला झोपाळा अन् घेतोय आनंद; कंडक्टर संतापला; VIDEO VIRAL

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी तैवानच्या संसदेत कामकाज सुरू होतं. सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी खासदारांना अधिक अधिकार देण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू होती. यादरम्यान, दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये बाचाबाची सुरू झाली.

विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी सत्ताधाऱ्यांकडून फाइल्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. वाद इतका विकोपाला गेला, की दोन्ही गटाचे खासदार एकमेकांवर तुटून पडले. त्यांनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. काहींनी अंगावर खुर्च्या देखील फेकल्या.

संसदेत गदारोळ होताच अनेकांनी पळ काढला. काही खासदारांनी टेबलावरून उड्या मारल्या. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

तैवानमध्ये नव्याने स्थापन झालेले सरकार चांगलेच वादात सापडले आहे. जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुका जिंकूनही लायच्या डीपीपीने संसदेत आपले बहुमत गमावले आहे. अहवालात म्हटले आहे की, विरोधी केएमटीकडे डीपीपीपेक्षा जास्त जागा आहेत, परंतु बहुमत तयार करण्यासाठी पुरेसे नाहीत.

Saam TV
Viral Video: नवरा-बायकोचं भांडण मिटवायला आले अन् २ कुटुंब तक्रार निवारण केद्रांतच भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com