Viral Video: डिलिव्हरी बॉयचा प्रताप.. पार्सल द्यायला आला अन् थेट... धक्कादायक घटना CCTVत कैद!

swiggy delivery boy Viral Video: एका डिलीव्हरी बॉयच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये त्याने थेट पार्सल द्यायला गेलेल्या ग्राहकाचे बूट चोरल्याचे दिसत आहे.
Viral Video:
Viral Video:Saamtv
Published On

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे, अपघाताचे, तर कधी लग्नातील खास व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या एका डिलीव्हरी बॉयच्या व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये त्याने थेट पार्सल द्यायला गेलेल्या ग्राहकाचे बूट चोरल्याचे दिसत आहे.

सध्या ऑनलाईन जेवण मागवणे, वेगवेगळ्या वस्तू मागवणे असे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. यासाठी नेमलेल्या डिलिव्हरी एजंट्सचे वेगवेगळे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यामध्ये स्विगीचा डिलिव्हरी बॉय चक्क बूट चोरी करत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यानंतर नेटकरी त्याच्यावर व्यक्त होत आहेत. व्हिडीओत डिलिव्हरी एजंट पॅकेज घेऊन आल्यानंतर, जाताना शूज उचलून घेऊन जाताना दिसत आहे. 

Viral Video:
Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्विगीचा डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी आला असून सुरूवातीला तो दाराची बेल वाजवतो. दरवाजा उघडेपर्यंत तो आजूबाजूला पाहून परिस्थितीचा आढावा घेतो. त्यानंतर काही वेळाने घरातून दरवाजा उघडून एक महिला पार्सल घेते. पार्सल घेतल्यानंतर तो पायऱ्या उतरून गेल्याचे नाटक करतो अन् पुन्हा येऊन शूज घेऊन पसार होतो.

तरुणाची ही सर्व चलाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आपल्यासोबत असाच प्रकार झाल्याचा अनुभवही कमेंट्समध्ये शेअर केला आहे.

Viral Video:
Lok Sabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ओबीसी बहुजन पार्टीत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com