Mumbai Local Garba : मुंबईच्या महिलांचा नादच खुळा! भरगर्दीत धरला गरब्यावर ठेका; पाहाच व्हायरल VIDEO

Viral Video : मुंबई लोकल म्हटलं की अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मुंबई लोकलमधील महिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात महिलांनी गरब्यावर ठेका धरला आहे.
Viral Video
Mumbai Local GarbaSaam Tv
Published On

श्रावण महिन्याला काही दिवसांपासून सुरुवात झालेली आहे. श्रावण सुरु होताच प्रत्येकाला विविध सणांचे वेध लागतात. मग लगबग सुरु होते ती सण साजरे करण्यासाठी. या तयारीत कुठे कोणत्या वस्तु विकत घेणे असो वा कुठे कोणते पदार्थ बनवण्याची तयारी. या संदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात,सध्या मुंबई लोकलमध्ये याच संदर्भात काही महिलांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,जो पाहून तुम्हीही लवकरच एका सणाच्या तयारीला लागाल.

सोशल मीडियावर मुंबई(Mumbai) लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा आपण अनेक मुंबई लोकलमध्ये तुळसी विवाह साजरा करताना चाकरमानी दिसतात तर कधी गणपतीमध्ये भजन गाणारे मंडळी दिसतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकलमधील असून काही महिलावर्ग दिवसभराचा कामाचा थकवा विसरुन एकत्रित गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. तुम्हीही नक्की हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका स्टेशनवरील आहे. पंरतू ते स्टेशन कुठले आहे हे समजू शकलेले नाही. मात्र या स्टेशनवर एक लोकल(Local) येते आणि स्टेशनवरील एका प्रवाशाने क्षणात समोरील लोकल ट्रेनमधील आनंददायी प्रंसग मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महिलांचा लोकलमधील डब्बा दिसत आहे. यामध्ये अनेक महिला बसलेल्या आहे परंतू काही महिला आहे ज्या मस्तपैंकी गरबा खेळत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील(instagram) '@i_love_mumbai'या अकाउटवर साधारण पाच दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये 'मुंबई की लोकल ट्रेन में मजे मजे'असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ समाज माध्यमावंर व्हायरल होताच नेटकरी वर्गातून व्हिडीओला ५ हजारापर्यंत लाईक्स मिळाले आहे तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com