Viral Accident Video: हा तर मोठा चमत्कार! एकापाठोपाठ 3 बाईकने चिरडलं; पुढे जे झालं ते अविश्वसनीय...

काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून बिचाऱ्या मुलीचं काय झालं असेल.. असाच प्रश्न आपल्याला पडतो.
Viral Accident Video
Viral Accident VideoSaamtv
Published On: 

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी.. असं आपण अनेकदा म्हणतो ते काही खोट नाही. आपल्या आसपास अशा अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये असे चमत्कार पाहायला मिळतात. जे पाहून आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही. सध्या अशाच एका चमक्तारिक व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

हा व्हिडिओ एका अपघाताचा असून एका चिमुकलीला सलग तीन मोटारसायकलींनी चिरडल्याचे दिसत आहे. मात्र तरीही ती मुलगी वाचते. या व्हिडिओने सर्वांनाच चकित केले असून हा चमत्कार घडला कसा? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. (Viral Video News In Marathi)

Viral Accident Video
Kalyan-Badlapur Railway Route: कल्याण-बदलापूरकरांसाठी गुड न्यूज; प्रवाशांच्या वेळेत होणार मोठी बचत, वाचा सविस्तर

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडिओ कधी आश्चर्याचा धक्का देणारे असतात तर कधी चकित करणारे असतात. मात्र सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचा स्वतःच्याच डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कारण या व्हिडिओमध्ये एक चिमुकली भीषण अपघातातूनही आश्चर्यकारकरित्या वाचल्याचे दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एका मोठ्या रस्त्यावर वाहनांची चांगलीच वर्दळ सुरू असल्याचे दिसत आहे. यावेळी अचानक एक चिमुकली रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करते. मात्र यावेळी एक भरधाव वेगात येणारी दुचाकी तिला धडक देते. या धडकेत मुलगी रस्त्यावर पडते. ज्यानंतर लगेच आणखी एक बाईक तिला चिरडून जाते, त्यापाठोपाठ तिसरी गाडीही तिला धडक देते.

Viral Accident Video
Maharashtra Politics: महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू, नाना पटोलेंचा संकल्प

काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून बिचाऱ्या मुलीचं काय झालं असेल.. असाच प्रश्न आपल्याला पडतो. परंतु सर्वात मोठा चमत्कार म्हणजे या मुलीला काहीही इजा झालेली नाही. एक महिला धावत जावून तिला उचलून घेते. तिला जखम झाली का बघते..

मात्र या चिमुकलीला कोठेही गंभीर जखम झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत नाही. ती महिला चिमुकलीला घेवून तिथून निघून जाते. या अपघाताचा सगळा थरार सीसीटिव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com