Viral Video: बापरे! रील्ससाठी थेट रेल्वे रुळावर झोपली अन् पुढे जे घडलं ते पाहून हादराल

Shocking Reels Video: सोशल मीडियावर वारंवार धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे, ज्यात तुम्हाला महिलेने केलेला स्टंट पाहण्यासाठी मिळेल.
Shocking Reels Video
Viral VideoSaam Tv
Published On

Women Shocking Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी बरेचजण कोणत्याही थराला जात असतात. धोकादायक स्टंट करून व्हायरल होण्याच्या नादात अनेकजण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका महिलेने चक्क रेल्वे रुळांवर झोपण्याचा स्टंट केला. धक्कादायक म्हणजे काही क्षणांतच भरधाव वेगात ट्रेन तिच्या दिशेने येते. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी स्तब्ध झाले असून, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

LIVE स्टंटचा थरार

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला, एक महिला रेल्वे रुळांवर झोपलेली दिसते आणि तिच्या हातात मोबाईल आहे त्यातून ती रील्स (Reels) व्हिडिओ शूट करत असताना दिसत आहे. हा सर्व प्रकार लांबून तिचा सहकारी मोबाईलमधे शूट करत असतो. त्यानंतर व्हिडिओत दिसते की, महिला जेव्हा रेल्वे रूळावर झोपते आणि तेवढ्यात तिच्या समोरुन ट्रेन येत असते. तरीही ती स्टंट करण्यासाठी रेल्वे रुळावर झोपण्याचा निर्णय घेते. मग काय शेवटी व्हिडिओत दिसते महिला रेल्वे रुळावर झोपली आहे आण तिच्यावरुन ट्रेन जाते. सर्व प्रकार महिलेने तिच्या मोबाईमध्येही कैद केला आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्यातील काहींनी कमेंट केली,''पागल झाली आहे'' तर एका यूजरने कमेंट केली,''निव्वळ मूर्खपणा आहे हा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जेल होईल थोड्या दिवसांनी. आणि कलम लागेल. कलमेचा नंबर आणि मार्क सोबतच येतील. जेल मध्ये गेल्यावर'' अशा प्रकारे नेटकऱ्यांनी स्टंटच्या धोकादायक स्टंटवर टीका केली आहे.

हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधी सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होण्यासाठी तरुणाई जीवघेणे स्टंट करताना दिसलेले आहेत. सध्या या महिलेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील rupaligaikwad609 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल होताच हजारो लाईक्स मिळालेले आहेत शिवाय मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप: महिलेचा स्टंटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Reels Video
Shocking Video: फेमस होण्याच्या नादात भयंकर घडलं! घराच्या छतावर रील्स करताना महिलेचा पायच घसरला; VIDEO VIRAL

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com