
Husband Wife Fight: नवरा-बायकोमध्ये खटके उडणं आणि करकोळ भांडणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, बऱ्याचदा या क्षुल्लक वादांचे रुपांतर गंभीर घटनांमध्ये होऊन जाते. अशीच एक थरारक घटना सध्या समोर आली आहे, जिथे नवऱ्याशी झालेल्या वादानंतर संतप्त बायकोने थेट विजेच्या भल्यामोठ्या खांबावर चढण्याचा धोकादायक प्रयत्न केला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेला सुखरुप खाली उतरवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमध्ये काही कारणावरुन जोरदार वाद (Argument) झाला. त्यांच्यातील हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात पत्नीने अर्थात त्या महिलेने कोणताही विचार न करता विजेच्या खांबावर चढण्याचा निर्णय घेतला. पाहता पाहता महिला खांबावर चढली आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही संपूर्ण घटना पाहून लोकांनी एकच गर्दी केली आणि तिला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला विजेचा भलामोठा टॉवर दिसत आहे. महिला टॉवरच्या अति उंचावर चढत गेली, त्यानंतर महिलेला वाचवण्यासाठी एक पोलिस टॉवरवर चढत गेला. पाहता पाहता महिलेच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी पोहचला. त्यानंतर पोलिसांनी प्रथम महिलेच्या मनस्थितीचा अंदाज घेतला मग तिला समजवण्यास सुरुवात केली. शेवटी महिलेचा राग शांत झाल्यावर तिला खाली सुखरुप उतरवण्यात पोलिसांना यश आले.
व्हायरल (Viral)होत असलेला हा प्रकार प्रयागराजमधील असल्याचे समजते. सध्या हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरील ''WeUttarPradesh'' या अकाउंटवर शेअर करण्याक आलेला आहे. व्हिडिओ इतका चर्चेत आला की पाहता पाहता देशभरातील अनेक नागरिकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.