Viral Video: नवऱ्याचा दुसरीवर जीव जडला, पहिल्या पत्नीला बेदम मारलं, अमानुष कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. घडलेल्या घटनेत नवऱ्याने असं काही केलं की, प्रत्येकजण हैराण झालेला आहे. नेमके काय घडते ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

West Bengal News: दुसरे लग्न करण्याची इच्छा असलेल्या नवऱ्याने आपल्या पहिल्या पत्नीला मुलांच्या समोरच अमानुषपणे मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रकार घरातील मोबाईल कॅमेऱ्यावर कैद झाला असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोबाईलमध्ये कैद झाले भीषण सत्य

महिलेला(Women) झालेल्या मारहाणीचा सर्व प्रकार घरातील एका लहान मुलाने मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला त्या व्यक्तीला गयावया करत असते शिवाय स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्नात असते पण तरीही तो तिला मारहाण करत राहतो. त्याच वेळी तिथे असलेले महिलेचे लहान मुलं या सर्वांमुळे घाबरुन गेलेले दिसत आहेत. मध्ये-मध्ये आईला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आरोपीने कोणत्याही भावना न बाळगता क्रूरता सुरूच ठेवली.

सोशल मीडियावर संतापाची लाट

व्हिडिओ(Video) काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. काहींनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि काहींनी कमेंटमध्ये म्हटलं की,''पोलिसांनी याची घटनेची दखल घ्यावी आणि नवऱ्याला फोडावे'' तर काही यूजर्संनी असं म्हटलं की,''त्या व्यक्तीला नागरिकांच्या ताब्यात द्या बाकीचे लोक पाहून घेतील'' शिवाय काही यूजर्संनी म्हटलं,''किती पागल आहे मुलांसमोर त्यांच्या आईला क्रुरपणे मारत आहे'' अशा तीव्र संतापजनकच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

ही घटना पश्चिम बंगालमधील असल्याचे समजत आहे. मात्र, अद्याप व्हिडिओतील व्यक्तीचे नाव किंवा त्याबद्द्ल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील justicewave_news या अकाउंटवर अपलोड केला आहे. फक्त इन्स्टाग्रामवर नाही तर तो अनेकांनी विविध माध्यमांवर जास्तीत जास्त शेअर देखील केलेला आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Video: मेरठमध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायकांची भांडणं! झिंज्या धरल्या, ओढत नेलं; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com