Plastic Rice: तुम्ही खाताय प्लॅस्टिकचा तांदूळ? संभाजीनगरमध्ये समोर आला धक्कादायक प्रकार; पाहा व्हिडिओ

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका गृहीणीने मार्केटमधून विकत घेतलेल्या तांदळामध्ये चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आले आहेत. त्यामुळे बाजारातून तांदूळ घेताना सावध राहा..
तुम्ही खाताय प्लॅस्टिकचा तांदूळ? संभाजीनगरमध्ये समोर आला धक्कादायक प्रकार; पाहा व्हिडिओ
Plastic RiceSaam Tv
Published On

धान्यामध्ये भेसळ आढळण्याची गोष्ट नवी नाही. राज्यात भेसळीच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार तुमची झोप उडवेल. सगळीकडेच गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे.

गृहीणींकडून त्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. बाप्पाला आवडतो मोदकांचा नैवेद्य आणि हेच उकडीचे मोदक तयार करण्यासाठी एका गृहीणीने मार्केटमधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आलेत.

तुम्ही खाताय प्लॅस्टिकचा तांदूळ? संभाजीनगरमध्ये समोर आला धक्कादायक प्रकार; पाहा व्हिडिओ
Pune Chain Snatching : वडापावचा मोह पडला सोन्याच्या भावात; महिलेचं पाच लाखांचं सोनं लंपास

शहरातील सिडको भागात राहणाऱ्या अमृता येवले यांनी मोदक बनवण्यासाठी मार्केट मधून हा तांदूळ खरेदी केला. मात्र तांदूळ धुताना त्यात चक्क प्लॅस्टिकचे तांदुळ आढळून आलेत. हा प्रकार पाहून अमृता यांनाही धक्का बसलाय.

कसा ओळखाल प्लास्टिकचा तांदूळ?

मूठभर तांदूळ पाण्यात ठेवा. प्लास्टिकचे तांदूळ पाण्यात तरंगू लागतात. भात शिजवल्यानंतर प्लास्टिकचा तांदूळ चिकटतो. त्याच्या गुठळ्या होतात. दर्जेदार तांदूळ तोंडात विरघळतो. बाजारातून तांदूळ खरेदी करण्यापूर्वी तांदळाचे काही दाणे चावून खा. भेसळ असेल, तर ते दातांना कडक लागतील. तांदुळाचा दाणे मंद आचेवर भाजून घ्या. जर तांदुळातून जळण्याचा वास येत असेल तर समजून जा की, तांदूळ हे भेसळयुक्त आहेत.

तुम्ही खाताय प्लॅस्टिकचा तांदूळ? संभाजीनगरमध्ये समोर आला धक्कादायक प्रकार; पाहा व्हिडिओ
Upcoming EV: मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! बाजारात येत आहे 21 नवीन इलेक्ट्रिक कार; वाचा सविस्तर माहिती

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे बाजारातून तांदूळ विकत घेताना काळजी घेतली पाहिजे. सणवार आले की अन्नधान्यामध्ये भेसळ होत असते. मावा, खवा पासून ते पनीर, सॉस अशा अनेक पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार उघडकीस येत आहेत. राज्यात भेसळ प्रतिबंधक कायदा आहे. त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरुच आहे. मराठवाड्यात आलेला हा प्लॅस्टिकचा तांदूळ कोणी आणला. व्यापाऱ्यांशी काही लागेबांधे आहेत का ? अन्न व औषध प्रशासनाकडून याची सखोल चौकशी होऊन भेसळ करणाऱ्यांना गजाआड केले पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राहकांनी सजग राहणंही तेव्हढेच गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com