Shocking News: लिफ्टच्या दारात केस अडकले अन् डोकं चिरडलं, ५२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

त्रिची शहरात लिफ्टमध्ये अडकून एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हार्डवेअर कंपनीत काम करणाऱ्या महिलेचा लिफ्टमध्ये अपघात झाला. महिलेचे केस दरवाज्यात अडकल्याने डोकं चिरडले गेले.
Shocking News
Shocking NewsSaam Tv
Published On

तामिळनाडूच्या त्रिची शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका ५२ वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. हार्डवेअर कंपनीत काम करत असलेल्या या महिलेचा कंपनीच्या लिफ्टमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला आहे.

Shocking News
Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या महिलेचे वय ५२ वर्ष असून ती तेन्नूर येथील रहिवासी होती. मागील गेली अनेक वर्षे ही महिला त्रिची शहरातील गांधी मार्केटजवळ हॉर्डवेअर कंपनीत एक महिला काम करत होती. नेहमीप्रमाणे गुरूवारी रात्री साधारण 9.45 वाजताच्या सुमारास ही महिला कामानिमित्त तिसऱ्या मजल्यावर जात होती. कंपनीच्या सर्व्हिस लिफ्टमध्ये ही महिला चढली. लिफ्टमध्येच चढतानाच ही घटना घडली आहे. ज्यामध्ये महिलेचा मृत्य़ू झाला आहे.

Shocking News
Ghatkopar Accident: मुंबईत हिट अॅण्ड रन, दारूच्या नशेत कार थेट दुकानावर धडकावली, थरारक VIDEO समोर

नेमकं काय घडलं?

हार्डवेअर कंपनीत कामानिमित्त तिसऱ्या मजल्यावर जाताना महिला लिफ्टमध्ये अडकली. लिफ्टमध्ये लिफ्टमध्ये चढताच दरवाज्यामध्ये महिलेचे केस अडकले. या महिलेने तेवढ्यात आरडाओरडा केला. परंतू दरवाजा बंद होताच महिलेचं डोकं चिरडले गेले. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघातानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला आहे.

Shocking News
Shocking : पेरू विक्रेत्याचा किळसवाणा कृत्य, थुंकी लावून पेरू विकताना दिसला; VIDEO झाला व्हायरल

लिफ्टमधून जाताना काय काळजी घ्याल

लिफ्टमध्ये अडकल्याच्या अनेक घटना याआधी देखील घडल्या असतात. लिफ्टमधून प्रवास करताना तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. लिफ्टमध्ये जाताना तुम्ही केस बांधले पाहिजे. तसेच लिफ्ट बंद होणाऱ्या दरवाजांमध्ये हात घालू नका किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टमध्ये गर्दी असल्यास थोडा वेळ थांबा आणि पुढची लिप्टची वाट पाहा. लिफ्टमधून प्रवास करताना लहान मुलांची काळजी घ्या त्यांचा हात धरून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com