Ghatkopar Accident: मुंबईत हिट अॅण्ड रन, दारूच्या नशेत कार थेट दुकानावर धडकावली, थरारक VIDEO समोर

Mumbai Car Accident: मुंबईतील घाटकोपर एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव कार फुटपाथ ओलांडून दुकानावर आदळली. दोन तरुणींसह तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
Ghatkopar Car Accident
Ghatkopar Car AccidentSaam Tv
Published On

मुंबईच्या घाटकोपर एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणारी कार फुटपाथ ओलांडून दुकानावर आदळली आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून यात दोन मुलींचा समावेश आहे. या अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून फरार झालेल्या कार चालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Ghatkopar Car Accident
Shocking News: व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये बसला, तेवढ्यात वेगवान कार घुसली, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

घाटकोपरच्या एलबीएस रोडवर आज सकाळी अपघात झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. भरधाव वेगात चालणारी कार बॅरिकेटिंग तोडून फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर आदळली आहे. यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोन तरूणी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता, कार ही बॅरिकेटिंग तोडून फुटपाथ ओलांडून दुकानाच्या समोर आदळली आहे. दरम्यान या कारमधील तरूणी बाहेर फेकली गेली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील दोन तरूणी आणि एक तरूण नशेत असल्याची माहिती आहे. कारमध्ये दारूची बॉटल आणि ग्लास देखील सापडले आहेत. नशेत असताना भरधाव वेगात कार चालवताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर कारमधील तरूणाने पळ काढला आहे.या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर तरूणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Ghatkopar Car Accident
Viral Video: एकमेकांची कॉलर पकडली अन् बेंचवर धरून आपटलं, भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिक्षकांची तुफान हाणामारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com