Shocking Incident: जीवघेणी चूक! चालत्या ट्रेनमध्ये चढायला गेला अन् पाचशे मीटर फरपटत गेला

Train Accident Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाचा थोडक्यात जीव वाचला आहे. नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.
Train Accident Viral Video
Shocking IncidentSaam Tv
Published On

 Latest Viral Video: रेल्वे प्रवास हा अत्यंत सोपा आणि जलद वाहतुकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतू, बऱ्याच वेळा प्रवाशांची घाईगडबड जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरते. अशात एका थरारक घटनेत, एका तरुणाने धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या तोल जाऊन तो रेल्वेला अडकला आणि तब्बल ५०० मीटरपर्यंत फरपटत गेला. सुदैवाने काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे त्या तरुणाचा जीव वाचला, पण या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

घाई जीवावर बेतली

व्हायरल(Viral) घटनेत तुम्हाला रेल्वे स्थानक दिसत आहे. ज्यामध्ये तरुण धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्नात होता मात्र ट्रेनच्या वेगामुळे तरुणाचा तोल गेला आणि तरुणाचा हात रेल्वेच्या दाराच्या हॅंडलला अडकला. त्यानंतर त्या तरुणाचे शरीर ट्रेनच्या बाहेर राहिले आणि तो तसाच धावत्या ट्रेनसोबत फरपटत गेला. सर्व प्रकार एका प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे. मात्र सर्व थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून इन्स्टाग्रामच्या ''parivartan_news'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. शिवाय हा व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल तीन लाखांच्यावर नेटकऱ्यांचे व्ह्यूज मिळालेले आहेत.

या घडलेल्या घटनेत तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, मात्र वारंवार घटना या वाढत आहेत. त्यामुळे नेटकरी वर्गातून कायमच संतापजनक प्रतिक्रिया येत असतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही अनेक प्रतिक्रिया (Shocking Reaction)आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''गरज असते काही धावती ट्रेन पकडण्याची'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे,''काळजी घ्या प्रत्येकाने'', तर तिसऱ्या यूजरने लिहिले,''चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करू नका'' अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

Train Accident Viral Video
Mumbai Local Train : मुंबईत पुन्हा एकाच ट्रॅकवर २ लोकल ट्रेन समोरासमोर; प्रवाशांना फुटला घाम,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com