CCTV Viral : मित्राला भेटायला गेला अन् विपरित घडलं, एसीचा बॉक्स डोक्यात पडून तरुणाचा जागीच मृत्यू, घटना CCTVत कैद

Shocking Viral Video : सोशल मीडिया दररोज अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
Shocking Viral Video
CCTV Viral Saam Tv
Published On

मृत्यू अशी बाब आहे ती कोणाला कधी टाळता आली नाही.मात्र अवेळी झालेल्या मृत्यूने प्रत्येकजण भावनिकरित्या खालावून जातो. आपल्यापैंकी प्रत्येकाला माहिती आहे कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी होईल,कसा होईल सांगता येत नाही. सोशल मीडियावर याचा प्रत्यय दाखवणारे व्हिडिओ व्हायरल आपल्याला पाहायला मिळतात.त्यात सध्या काहीसा एक प्रकार समोर आला आहे,ज्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय.

Shocking Viral Video
CCTV Viral : ठाण्यात दरोडेखारांचा डाव फसला; दुकानदाराने चोरांना धू धू धुतलं, VIDEO व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडिओत नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, एक तरुण इमारतीच्या खाली स्कूटीवर बसलेला दिसून येत आहे. काही वेळात या तरुणाचा मित्र तिथे येतो आणि दोघेही बोलताना दिसत आहेत मात्र काही क्षणात इमारतीच्यावरुन एसीचा भाग खाली असलेल्या या तरुणावर जोरदार कोसळतो. तरुणाच्या डोक्यावर इतका जोरदार आदळतो की स्कूटीवर बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू होतो तर बाजूचा तरुण (Boy)जखमी होतो.

मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व धक्कादायक(Shocking) प्रकार राजधानी दिल्लीतील असल्याचे समजते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @vohrabs या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत. व्हिडिओ पाहून नेटकरी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Cctv Footage : संकटात खाकी वर्दीतील 'देव' मदतीला धावला; धावत्या रेल्वेतून खाली पडणाऱ्या महिलेसह बाळाचे वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com