
Nagpur Accident Video: नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक विचित्र अपघात घडलेला आहे. सध्या सोशल मीडियावर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सीसीटीव्ही व्हिडिओत तुम्हाला, रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा होत असताना दिसत आहे. दरम्यान, त्या रस्त्यावरुन एका बाजूने एक ई- रिक्षा जात असते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार दुचाकीस्वाराला ई रिक्षाचा कट लागतो आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या चार चाकीला तो धडकला जातो. अपघात इतका जोरदार होता की दुचाकी चालक दूर फेकला जातो.
घटनेनंतर परिसरातील नागरिक तात्काळ जखमी व्यक्तीच्या दिशेने धाव घेताना व्हिडिओत दिसत आहे. ही संपूर्ण घटना जवळील दुकानाबाहेर असलेल्या सीटीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाता संदर्भात अद्याप पोलीस तक्रार दाखल झाली नसून अपघातांचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर वायरल होत आहे.
नागपुरातील घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत विचित्र अपघात! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण'', असे लिहिले आहे. अपघात पाहिल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील बऱ्याच लोकांनी दुचारीस्वाराची चुकी दाखवली आहे.
टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.