Shark Eats Man Video Viral : हॉलिवूड सिनेमातील सीन नाही तर सत्यघटना; शार्क माशाने काही सेकंदात व्यक्तीला गिळलं

VIral VIdeo : काही क्षणात या शार्क माशाने या व्यक्तीला गिळलं आहे.
viral video
viral videoSaam tv
Published On

Viral VIdeo : मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीयोत एका भलामोठा शार्क मासा एक व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे. काही क्षणात या शार्क माशाने या व्यक्तीला गिळलं आहे.

अनेक सिनेमांमध्ये तुम्ही शार्क माणसांवर हल्ला करणाचे सीन पाहिले असतील. मात्र इजिप्तमधील नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी ही थरारक घटना अनुभवली आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे शार्कने तरुणावर हल्ला केला तेव्हा त्याचे वडील समुद्राच्या किनाऱ्यावर उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यासमोर ही संपूर्ण घटना घडली. (Latest News Update)

viral video
Train Viral Video: ट्रेन येत असल्याचे पाहून तरुणानं केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य, व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर एक रशियान व्यक्ती पोहत होता. हा व्यक्ती आरामात पोहत असताना तिथे अचानक शार्क मासा दिसू लागतो. काही क्षणात शार्क त्या व्यक्तीवर हल्ला चढवला. व्यक्तीने पोहत किनारा गाठण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याला त्यात यश मिळालं नाही.

viral video
AC Local Viral Video: दे दणादण! शाब्दिक चकमक ते लाथा बुक्क्यांची तुफान बरसात; AC लोकलमध्ये महिलांची जुंपली, VIDEO

इजिप्तमधील हुरघाडा येथील रेज सी रिसॉर्ट शहराजवळील ही घटना आहे. इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले की, ही व्यक्ती रशियन नागरिक असल्याचे मानले जात आहे. रशियन दूतावासाने निश्चितपणे या व्यक्तीची ओळख पटवली आहे. परंतु त्याचे नाव उघड केले नाही.  (Viral Video)

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. आधी शार्क या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरताना दिसतो. व्हिडिओमध्ये लोकांचा आवाज ऐकू येत आहे. काही लोकांनी त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्यात यश मिळालं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com