साराचा हॉट व्हिडिओ व्हायरल? सारा तेंडूलकरच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

Truth Behind Sara Tendulkar ‘Bold Look’ Viral Clip Revealed: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता सारा तेंडूलकरचा व्हिडिओ व्हायरल होतोय...बोल्ड लूकमध्ये सारा फिरत असल्याचा हा व्हिडिओ आहे...पण, खरंच हा व्हिडिओ खरा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Sara Tendulkar viral video fact check reveals AI-generated deepfake clip
Sara Tendulkar viral video fact check reveals AI-generated deepfake clipsaam tv
Published On

हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, साराने कशी बोल्ड लूकमध्ये फिरतेय असा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...तर काहींनी तर यावरून टीकाही केलीय...या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरची मुलगी सारा एका इमारतीतून बाहेर पडताना आणि पापाराझी तिचे फोटो काढत असताना दिसत आहेत...त्यानंतर ती वाट पाहणाऱ्या गाडीकडे चालत जाते...त्यावेळी तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...व्हिडिओ व्हायरल करून अनेकांनी कमेंट्स केल्यायत...तर काहींनी आक्षेपार्हही कमेंट केल्यायत...त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ तपासून पाहिला...व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी साराच्या इन्स्टासह सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं...त्यावेळी आम्हाला आणखी एक व्हिडिओ सापडला...दोन्ही व्हिडिओंमध्ये तफावत आढळून आली...

आता हे दोन्ही व्हिडिओ पाहा...पहिल्या व्हिडिओत आणि दुसऱ्या व्हिडिओत बराच फरक दिसतोय...सारा काळ्या रंगाच्या टॉपमध्ये आणि राखाडी रंगाची ट्राउझर्स दिसतेय...आणि दुसऱ्या व्हिडिओ हा AI निर्मित असल्याचं दिसतंय...पहिल्या व्हिडिओचा आधार घेत एआयच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ बनवण्यात आला...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

सारा तेंडुलकरचा व्हिडिओ AI च्या माध्यमातून बनवला

AIच्या माध्यमातून साराचा बोल्ड व्हिडिओ तयार केला

सत्यता तपासल्याशिवाय असे व्हिडिओ पोस्ट करू नका

चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून साराची बदनामी

सारा तेंडूलकरचा डिपफेक व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला...अशा प्रकारे साराने बोल्ड कपडे घातलेले नाही...तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा व्हिडिओ शेअर करून साराची बदनामी करण्यात आली...त्यामुळे अशा कुणाच्याही व्हिडिओची सत्यता पडताळल्याशिवाय शेअर करू नका...सारा डिपफेकची शिकार झाली असून, आमच्या पडताळणीत साराने बोल्ड लूक केल्याचा व्हिडिओ असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com