भयंकर! ट्रेन येताच थेट रुळावर पळत पळत आली तरुणी अन्…, VIDEO व्हायरल

Railway Station Incident: रेल्वे स्थानकावर एका तरुणीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिने ट्रॅकवर उडी मारण्याचा प्रयत्न केला असता, सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला. काही सेकंदांनी ट्रेन आली असती आणि मोठी दुर्घटना झाली असती.
Railway Station Incident
Saam Tv
Published On

Shocking Viral Video: एका क्षणाची धावपळ आणि धाडसी निर्णयामुळे एका निराश मुलीचा जीव वाचला. ही घटना कोणत्याही चित्रपटातील दृश्यासारखीच वाटावी अशी होती. पण ही वास्तवातील गोष्ट आहे. वेळेवर झालेल्या कृतीने आणि सामान्य नागरिकांच्या जागरूकतेमुळे एक अमूल्य प्राण वाचला.

ही घटना नेमक्या कोणत्या रेल्वे स्थानकावर घडली ते अद्याप समजू शकले नाही. मात्र, सकाळची वेळ होती आणि रेल्वे(Railway) स्थानकावर नेहमीप्रमाणेच वर्दळ सुरू होती. प्रवासी आपल्या रोजच्या प्रवासासाठी गाड्यांची वाट पाहत होते. प्लॅटफॉर्मवर स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी आपली कामं करत होते. त्याचवेळी एक तरुण मुलगी अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत रेल्वे स्टेशनपासूनच्या रेल्वे रुळांवर फिरताना दिसली.

संशयास्पद हालचाली

सफाई कर्मचाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. ती वारंवार रेल्वे रुळांकडे पाहत होती, तिचा चेहरा गंभीर आणि गोंधळलेला होता. काही क्षणांनी तिने अचानक धावत जाऊन ट्रॅकवर उडी मारण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून एक क्षण तर सर्वजण हादरलेच.

तरुणी ट्रॅकवर उडी मारणार इतक्यातच, जवळच झाडू मारत असलेल्या दोन सफाई कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून लगेच तिच्याकडे धाव घेतली. एकाने तिचा हात पकडला, तर दुसऱ्याने तिला मागे ओढले. अवघ्या काही क्षणातच समोरून भरधाव लोकल ट्रेन धडधडत आली. जर काही सेकंद उशीर झाला असता, तर मोठी दुर्घटना घडली असती.

हा व्हिडिओ (Video) सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र व्हायरल होत असून एक्स प्लॅटफॉर्मवरील
@gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही यूजर्संनी तरुणींची अशा वागण्याचा संताप व्यक्त केला आहे तर काहींनी असं नको करायला पाहिजे होत असं म्हटलं आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Railway Station Incident
पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com