Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

Punjab Flood News: उत्तर भारतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पंजाब, हिमाचल, जम्मू काश्मीर पूरामुळे जलमय झाले आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवली गेली आहेत.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

गेले काही दिवसापासून उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली या राज्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहे. जागोजागी पाणी साचलं आहे . शाळा, महाविद्यालये , कार्यालये यांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. अनेक कार्यलयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. प्राणी, जनावरांना देखील याचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात प्राण्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. सुरक्षित ठिकाणी जनावरांना हलवण्यात आले आहे. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. गावे, शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर या पूरपरिस्थितीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. पंजाबमध्ये पुरामुळे परिस्थिती खूपच वाईट झाली आहे.. १९८८ नंतर पंजाबमध्ये पुन्हा पूर आल्याच चित्र दिसत आहे. जम्मू काश्मीरसह हिमाचलमधून येणाऱ्या पाण्यामुळे संकट आणखी वाढले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वत्र पाणी साचले आहे. पुराच्या पाण्यातून प्रवास करणे कठीण झाले आहे.पंजाबची ही परिस्थीती पाहता जनावरांना घराच्या टेरेसवर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे. दरम्यान गुरांना घराच्या टेरेसवर ठेवले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली व्हिडीओ पाहून पावसामुळे परिस्थिती किती बिकट झाली आहे हे दिसत आहे. अनेकांचे खाण्या- पिण्याचे देखील हाल झाले. शाळा, महाविद्यालये, कार्यालये बंद ठेवण्यात आले आहेत.

Viral Video
Viral Video: पुण्याच्या आजींचा माधुरी दिक्षीत सारखा भन्नाट डान्स, गणपतीसमोरचा व्हिडीओ पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com