Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: बॉसला वैतागून नोकरी सोडली; ऑफिसबाहेर ढोल-ताशा पथक आणून तरुणाने केला आनंद साजरा

Pune Viral Video: प्रत्येक व्यक्तीसाठी नोकरी करणे गरजेचे आहे. आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरी ही करावीच लागते. परंतु अनेकदा या नोकरीत अनेक लोक नाखुश असतात.

प्रत्येक व्यक्तीसाठी नोकरी करणे गरजेचे आहे. आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरी ही करावीच लागते. परंतु अनेकदा या नोकरीत अनेक लोक नाखुश असतात. ऑफिसमधील टॉक्सिक वातावरण, ऑफिसमधील कामाचा व्याप या सगळ्यामुळे त्यांना ऑफिस सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु ऑफिस सोडताना एक तरुणाने असे काही केले की त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या तरुणाने नोकरीच्या शेवटच्या दिवशी बॉससमोर ढोल वाचवत डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक अनिकेत नावाच्या तरुणाने ऑफिसची नोकरी सोडली आहे. तो ऑफिसमध्ये सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. पगारवाढ नसल्याने त्याने हा निर्णय घेतला होता. परंतु ऑफिसच्या शेवटच्या दिवशी त्याने असं काही सेलिब्रेशन केलं आहे की सर्वजण बघत बसले होते. व्हायरल व्हिडिओत अनिकेत आणि त्याचे मित्र ऑफिसच्या बाहेर ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत अनिकेत आपल्या मित्रांसोबत ऑफिसच्या बाहेर जातो. तेवढ्यात त्याचा बॉस बाहेर येत असतो. याच संधीचा फायदा घेत अनिकेत आणि त्याचे मित्र ढोल- ताशाच्या तालावर नाचतात. या संपूर्ण प्रकाराचा त्याच्या बॉसला खूप राग आलेला दिसत आहे. तो सर्वांना तिथून बाहेर जा असे सांगत होता.

Viral Video
Spiderman-woman Viral Video : स्पायडरमॅन-स्पायडरवुमनला बाईकवरचे स्टंट पडले महागात; Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

व्हायरल व्हिडिओ शेअर करत त्याच्या मित्राने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, 'मला वाटतं बरेच लोक या गोष्टीशी संबंधित असतील. आजकाल टॉक्सिक वर्क कल्चर सर्वत्र दिसून येतं. जिथे आदर न देणे हे सामान्य आहे. अनिकेत त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी सज्ज आहे. अनिकेतची ही गोष्ट लोकांना प्रेरणा देईल'. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Viral Video
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमधील अद्भूत नजारा! भांडण सोडून महिलांनी धरला ठेका; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com