Plane Viral Video: विमान हवेत असतानाच उघडला दरवाजा! भयंकर घटनेनं प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

Plane Door Opens In Air : विचार करा तुम्ही एखाद्या विमानात बसला आहात आणि हवेत असताना विमानाचा दरवाजा अचानक उघडला तर?
Video Viral
Video Viralsaam tv
Published On

Plane Door Opens In Air Video Viral : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ खूप गमतीशीर असतात, तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून तुम्ही आवाक होऊ शकता. विचार करा तुम्ही एखाद्या विमानात बसला आहात आणि हवेत असताना विमानाचा दरवाजा अचानक उघडला तर? विचार करूनच अंगावर शहारे आलाेना? पण असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हारल होत आहे.

हा व्हिडिओ ब्राझील येथे जात असलेल्या एका विमानाचा आहे. हे विमान हवेत असताना त्याचा दरवाजा अचानक उघडला. हा व्हिडिओ विमानातीलच एका प्रवाशाने काढला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की विमानाचा दरवाजा हवेच्या दाबाने वर गेला आणि नंतर तो खाली आलाच नाही. विमानातून आकाशातून जमिनीवरील दृष्य अगदी स्पष्ट दिसत आहे.

Video Viral
Viral Cricket Video: एकही चौकार अन् षटकार न मारता फलंदाजाने एका चेंडूवर केल्या ८ धावा; विश्वास बसत नाही ना? पाहा VIDEO

हा व्हिडिओ ब्राझीलियन एअरलाइनच्या विमानाचा आहे. हे विमान १२ जूनला साओ लुईस येथून सालवाडोरला जात होतं. यादरम्यान अचानक विमानाचा दरवाजा उघडला. या प्रसंगामुळे प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु वैमानिकाने विमानावरील नियंत्रण सुटू दिले नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. (Viral Video)

मीडिया रिपोर्टनुसार ब्राझीलचा प्रसिद्ध गायक टीएरी आणि त्याची टीम या विमानातून प्रवास करत होते. या विमानाचा कार्गो गेट अचानक उघडल्याने प्रवाशी घाबरले होते. या व्हिडिओत उघडलेल्या दरवाज्याच्या बाजूला प्रवाशी बसल्याचे दिसत आहे. उघडलेल्या दरवाजाच्या बाजूला प्रवाशांच्या बॅग्स असल्याचे दिसत आहे. दरवाजाच्या बाजूला बॅग्स असल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. (Viral News)

हा व्हिडिओ ट्विटरवर @fl360aero या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर यूजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी प्रवासांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com