Viral Cricket Video: एकही चौकार अन् षटकार न मारता फलंदाजाने एका चेंडूवर केल्या ८ धावा; विश्वास बसत नाही ना? पाहा VIDEO

8 Runs On 1 Ball: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या एका सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
VIRAL VIDEO
VIRAL VIDEO Instagram
Published On

Viral Video: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या एका सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे,ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

हा व्हिडिओ आहे दिवंगत क्रिकेटपटू अँड्रू सायमंड्सचा. काही महिन्यांपूर्वी रस्ते अपघातात अँड्रू सायमंड्सचा मृत्यू झाला होता. एकाच चेंडूवर ८ धावा करणं शक्य आहे का? असा प्रश्न विचारला तर नक्कीच उत्तर नाही असणार आहे. मात्र अँड्रू सायमंड्सने एकाच चेंडूवर ८ धावा केल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

VIRAL VIDEO
Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर! माजी कर्णधाराला मिळू शकते मोठी जबाबदारी

तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना सुरु होता. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाने अँड्रू सायमंड्सला शॉर्ट चेंडू टाकला. ज्यावर अँड्रू सायमंड्सने पूल शॉट मारला. हा चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने गेला. सीमारेषेजवळ चेंडू पोहोचणार इतक्यात चेंडू अचानक थांबला.

इतक्यात अँड्रू सायमंड्सने धावत ३ धावा पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षक चेंडू फेकणार इतक्यात अँड्रू सायमंड्सने चौथी धाव देखील पूर्ण केली. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, धावत ४ धावा पूर्ण केल्या गेल्या मग एका चेंडूवर ८ धावा कशा झाल्या. (Latest sports updates)

तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा अँड्रू सायमंड्स चौथी धाव घेण्यासाठी धावतो त्यावेळी क्षेत्ररक्षक ओव्हर थ्रो करतो. हा चेंडू न थांबता ४ धावांसाठी सीमारेषेच्या दिशेने जातो.

अँड्रू सायमंड्सने धावत ४ धावा पूर्ण केल्या आणि ओव्हर थ्रोच्या ४ धावा, अशाप्रकारे अँड्रू सायमंड्सने एकाच चेंडूवर ८ धावा पूर्ण केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com