
पुणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका पेट्रोल पंपावर पाळीव पिट बुलने थेट एका ग्राहकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित ग्राहक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ही घटना पुण्यातील एका प्रसिद्ध पेट्रोल पंपावर घडली. स्थानिक वृत्तानुसार, पेट्रोल पंपाचा मालक आपल्या पाळीव पिट बुल कुत्र्याला नेहमीच पंप परिसरात खुले सोडतो. पंपावर इंधन भरायला आलेला ग्राहक कारमधून खाली उतरला आणि त्या क्षणी अचानक पिट बुलने त्याच्यावर हल्ला केला. डोळ्यासमोर अचानक आलेल्या या प्रकारामुळे ग्राहक आणि आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, पिट बुलने ग्राहकाच्या हाताला जोरात चावा घेतला. ग्राहकाने स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र कुत्रा घट्ट चावून बसला होता. अखेर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत कुत्र्याला दूर केलं. मात्र, तोपर्यंत ग्राहकाच्या हाताला खोल जखमा झाल्या होत्या आणि रक्तस्रावही सुरू झाला होता. स्थानिक लोकांनी तातडीने जखमी व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच नेटकऱ्यांनी पेट्रोल पंप मालकावर ताशेरे ओढले आहेत. ''हा निव्वळ बेदरकारपणा आहे,'' असं अनेकांनी म्हटलं आहे. काहींनी अशा प्रकारच्या प्राण्यांना खुले सोडणाऱ्या मालकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. ''सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांची जबाबदारी न मानणं ही गुन्हेगारी आहे',' असंही काहींनी लिहिलं आहे
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.