प्रत्येक कुटुंबात एकाला मिळणार सरकारी नोकरी? सरकारची 'एक परिवार-एक नोकरी योजना

Viral ‘One Family One Job: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... आता सरकार प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देणार आहे...होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच सरकारची अशी योजना आहे का...? या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...
One Family One Job Scheme viral message fact check
One Family One Job Scheme viral message fact checksaam tv
Published On

सरकारी नोकरी आता प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला मिळणार आहे, असा दावा केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय...आणि हा दावा ऐकून आनंद झालाय...ुपण, व्हायरल मेसेजमध्ये जो दावा केलाय त्यात तथ्य आहे का...? प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळणार आहे का...? असे प्रश्न उपस्थित होतायत....त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

सरकारकडून एक परिवार-एक नोकरी योजना राबवली जातेय. देशातील प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला थेट सरकारी नोकरी दिली जाणार आहे. हा दावा केल्याने अनेकांना याची सत्यता जाणून घ्यायची आहे...सरकारची अशी योजना असेल तर सरकारी नोकरी कशी मिळवायची...? त्यासाठी काय करावं लागेल...? सरकारी नोकरीसाठी शिक्षणाची काय अट आहे आणि काय नियम आहेत...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे...प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळणार असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत अधिकृत माहिती सरकारकडूनच मिळू शकते...आमच्या टीमने याची माहिती मिळवली असता, काय सत्य समोर आलं पाहुयात...

एक परिवार-एक नोकरी अशी सरकारची योजना नाही

प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी मिळणार हा दावा खोटा

खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका

कुणीही फॉर्म भरून घेत असेल तर माहिती देऊ नका

नोकरी हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे...आणि तीही सरकारी नोकरी मिळणार असेल तर काहीजण पैसेही मोजायला तयार असतात...हवे तेवढे पैसे द्यायला लोक तयार असतात...त्यामुळे तुम्हाला असं कुणी सरकारी नोकरी देण्याची योजना असल्याचं सांगत असेल तर विश्वास ठेवू नका...तुमची फसवणूक होऊ शकते...त्यामुळे आमच्या पडताळणीत प्रत्येक कुटुंबात एकाला सरकारी नोकरी मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com