दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Nashik Shocking Video: नाशिकमध्ये दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून पाच ते सहा युवकांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन कामगारांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nashik Shocking Video
CCTV Footage Captures Moment Youths Assault Petrol Pump Workers in Nashik Over Alcohol DisputeSaam Tv
Published On

नाशिक शहरातील एका परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पाच ते सहा युवकांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या दोन कामगारांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २ जुलै रोजी सायंकाळी घडली. इर्शाद युसुफ सय्यद (वय ३९, रा. गोसावी वाडी, नाशिकरोड) हे बिटको चौकातील पेट्रोमाईन नावाच्या पेट्रोल पंपावर काम करत आहेत. त्या दिवशी सायंकाळी ते आपले काम संपवून घरी परतत असताना वास्को चौक येथे त्यांची ओळख असलेले रोहित गायकवाड आणि विकी हे दोघे समोर आले. त्यांनी इर्शाद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र इर्शाद यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला.

मनात घेतला राग, सहकाऱ्यासह घडवला हल्ला

पैसे न मिळाल्याचा राग मनात धरून काही वेळातच रोहित गायकवाड, सुमित खरे, विकी आणि त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार पुन्हा पेट्रोल पंपावर आले. त्यांनी इर्शाद सय्यद आणि त्यांचे सहकारी वाहिद शेख यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी धारदार शस्त्र काढून दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पेट्रोल पंपावर मोठी घबराट उडाली. आरोपींनी पंप जाळून टाकण्याची धमकीही दिली. यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावर दगडफेक केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

CCTV मध्ये कैद संपूर्ण घटना

संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून याच फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. इर्शाद सय्यद यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Nashik Shocking Video
नागपुर रेल्वे स्थानकावरील थरार! प्लॅटफॉर्मवरून धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा तोल गेला; पोलिसांनी वाचवले प्राण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com